देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पाऊस

सरीवर येते सर शुक्रवार, २७ जानेवारी २०१२, ११:२३ (+०५:३०)

anuvina अनुविना

सरीवर येते सर घेऊन हिरवा मोहोर रानावनात गारवा फुलापाना आला बहर सरीवर येते सर वाढे पावसाचा जोर भिजलेल्या झोपडीला थेंब थेंबाची झालर सरीवर येते सर मेघ ...

तु येणार आहेस गुरुवार, २९ डिसेंबर २०११, १५:५५ (+०५:३०)

कुठेतरी छानसे वाचलेले

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
झाडावरली कोकिळा जेव्हा
गाणं गाऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा
माती तिचा गंध देऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
वर्षाराणी पाणी सांडुन जेव्हा
जमिनीवरुन वाहु लागते...

तु येणार आहेस
याची ...

मन शनिवार, २४ डिसेंबर २०११, १०:२६ (+०५:३०)

कुठेतरी छानसे वाचलेले

तेव्हा आपण विचारतो मनाला
का जीव लावला त्याला
ज्याच्या साठी पूर्ण जग आपण विसरतो
त्याच्याच आठवणीच्या राज्यात आपणच परके असतो

का मनाचा गुंता सुटत नाही?
माहित असते त्या वाटेला जायचे नाही
पण तिथेच भरकटल्याशिवाय मन हि राहत नाही

का कधी तेव्हाच पाऊस बरसतो, जेव्हा त्याची गरज नसते
कितीही त्याने भिजवले तरी मन मात्र तेव्हा कोरडेच राहते

एकदा असचं विचारला तुला शनिवार, ०३ डिसेंबर २०११, २१:२१ (+०५:३०)

कुठेतरी छानसे वाचलेले

एकदा असचं विचारला तुला
येतेस का फिरायला पावसात
छान केस उडवत नाही म्हणालीस
तुज्या समोर गोंधालेला मी पाहून
छान हसलीस तू,

... तुझ्या उडत्या केसांकडे पाहत
मी उगीचच हसलो जणू
तुझी थट्टा मला कळली होती
नेहमीच मला वाटायच
तू आहेस कुठेतरी आस पास,

पाऊस आला कि भिजावेसे वाटते... शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, १४:४५ (+०५:३०)

कुठेतरी छानसे वाचलेले

पाऊस आला कि भिजावेसे वाटते
पण भिजले कि तुझी आठवण येते,
चिंब पाऊसात मी तुझ्या बरोबर
भिजायची
छत्री असूनही ती बंद असायची
चिखलात तू मुद्दाम चालायाचास
मी ओरडेन तुला ही वाट पहायाचास
वाटेतल्या स्टॉल वर चहा पीत असायचो
आपण तेव्हा किती गप्पा मारायचो
मला मात्र खूप राग यायचचा

किल्ले असावा… मंगळवार, ०२ ऑगस्ट २०११, १३:५६ (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाची ताठ मानेने साक्ष देणारे गडकोट किल्ल्यांची सफर, श्रावणातला पहिला विकांत, मस्त धो-धो पाऊस आणि दुर्गप्रेमी ...

कोसळणार्‍या त्या चिंब पावसात गुरुवार, २८ जुलै २०११, २०:५२ (+०५:३०)

विनायक मराठी कविता

रात्र बरीच झाली होती
पौसही कोसळत होता
झालो क्षणातच एकरूप आम्ही
कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...

खुप समजावले मी तिला
नको भिजुस या क्षणाला
ऐकायचेच नव्हते तिला
कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...

राहिलो एकटा आडोशाला उभा
पण पाहत ...

पाऊस….वेडं करणारा………………..!!! बुधवार, १३ जुलै २०११, १०:११ (+०५:३०)

Atul kharadpatti

पाऊस!!! ..पाऊस ….म्हटलं की  वेडं होणं आलंच…..

अगदी सुरवात करायची झाली  तर…

वळवाचा पाऊस… ते कुठेतरी लांब डोंगरावर काळे-काळे ढग जमा झालेले…

आता काही क्षणात धो-धो कोसळेल ..आणि सगळ ओलं-चिंब करून टाकेल…

असं वाटत असतानाच…जोराचं वादळ येतं…

वारा सगळे झाडे इकडे-तिकडे करतो…सगळी वाळलेले पाने गळून पडतात….काही झाडे कोसळतात…….सगळी धावपळ…

धो-धो वाटणारा पाऊस…….मात्र वादळ चार टपोरे ...

ती खरंच पावसासारखी. शुक्रवार, ०८ जुलै २०११, ०७:२९ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

ती म्हणजे खरंच पावसासारखी.
थेंबा थेंबाने येते आणि आपल्याला व्यापून टाकते.
वरून दिसतो आपण कोरडेच
पण ती आपलं मनही ओलेचिंब करून जाते.

आपण पहात रहातो खिडकीतून रिमझिमणारा पाऊस पाणी,
पण तो पाऊस नसतोच मुळी त्या असतात तिच्या आठवणी.
आपल्याही नकळत आपण खिडकीतून हात बाहेर काढतो
आणि तिला तळहातावर घेतो. पुन्हा ...

रिमझिम रिमझिम पडतो पाऊस गुरुवार, ०७ जुलै २०११, १६:०५ (+०५:३०)

मृणाल कानडे MrunalKanade's Blog

 
रिमझिम  रिमझिम  पडतो पाऊस , रिमझिम  रिमझिम  पडतो पाऊस
सुसाट वर, मौसम सारा , थंडीची तो देतो चाहूल

रिमझिम  रिमझिम  पडतो पाऊस ,  रिमझिम  रिमझिम  पडतो पाऊस ||
 
सडा गुलमोहोरांचा , फुलांपरी चांदण्यांचा 
खळखळ खळखळ टाळ वाजे, पावसात भिजतांना  
टप टप   आवाज करीत थेंब , विराजती मणी ...