वजन हा गेल्या काही दिवसांपासून खुपंच जिव्हाळ्याचा विषय होऊन गेला आहे. खर तर पोटाचा वाढता ‘नगारा’ हा त्याहून अधिक जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पण सध्यातरी वजनावरच बोलू. आता वजन किती असावं यावर चर्चा करायला फार काही महान नाही. पण साधारणपणे जितके इंच उंची, तितके किलो वजन असायला हवं, अस वडील नेहमी बोलतात. तेवढे असेल तर सुधृढ. कमी असेल तर लुकडा, आणि जास्त असेल तर जाड. आता माझी उंची पाच ...