देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गाणी

फेसबुक गंमती गुरुवार, २६ जानेवारी २०१२, २०:२८ (+०५:३०)

यशोधन वाळिंबे डिजीटल मराठी वाचनालय

नमस्कार मित्रांनो आपल्याला फेसबुक वर जर मजेदार विनोद, दर्जेदार साहित्य अथवा गप्पा गोष्टी, गाणी , माहितीपर चित्रफिती ...

आरोमले… शनिवार, २१ जानेवारी २०१२, २२:२६ (+०५:३०)

गुहर होने तक...

काय गायलीस पोरी!  काल ऐकलं पहिल्यांदा अन्‌ ऐकतोच आहे तेव्हापासून.  सडा शिंपलेल्या अंगणात सकाळी सकाळी तुळशीजवळ लावलेल्या उदबत्तीतून गोलगोल सुगंधाचे धूसर गोल मंद मंद वर वर विरळ होत जावेत तसा फिरतोय तुझा आवाज माझ्या मनी-मानसी, आरोमले…, जीव पिळून, “नको जाऊ ना प्लीज़” असं म्हणावं…जाणारा जातोय, ...

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले सोमवार, ०९ जानेवारी २०१२, ०४:३४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

तो:
ओठ गुलाबी काय नकळत बोलले
ती:
अं हं
तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले

तो:
संध्या आज का फुलूनी आली
रंग तांबडे सोनेरी ल्याली

ती:
दिवसा रातीच्या मिलनवेळी
संध्या असली फुलूनी आली
लाजलाजूनी बघ झाली वेडी
त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले

तो:
पाण्यावरचे तरंग का हालती डुलती

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची शनिवार, ३१ डिसेंबर २०११, ०३:०३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||

या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन

युगलगीत: बासूंदी गोड गोड शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, ०४:५८ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

युगलगीत: बासूंदी गोड गोड

तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||

ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||

तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी ...

(प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, ०२:१९ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

तुझी माझी प्रित जमली

(टु ऋ : चाल एखाद्या भांगड्यासारखी आहे ब्वॉ.)

तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
लपून छपून प्रेम ते केले
कधी कुणा नाही कळले
आता वाट नको पाहू
वेळ लग्नाची झाली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

तो:
कानी तुझ्या ...

दत्त दत्त बोलत गेलो बुधवार, २८ डिसेंबर २०११, ०४:४३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो
गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो
दत्ताला भजूनी धन्य झालो
झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो ||

दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी
जगामधे मीच आहे सर्व सुखी
नकळे मला मी कोण होतो
दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो ||

कळीकाळानं असला कसला मौका साधला बुधवार, २८ डिसेंबर २०११, ०४:४२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

कळीकाळानं असला कसला मौका साधला

कळीकाळानं असला कसला मौका साधला
व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ||

बाप तू रं आमचा तूच आमची माय
दूध बी तूच आन तूच दूधावरली साय
कोना म्हनू आता आमी माय अन बाप
...

चालू नको अशी तू बुधवार, २८ डिसेंबर २०११, ०४:४१ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

चालू नको अशी तू

चालू नको अशी तू तोर्‍यात ग तोर्‍यात
केस उडतात भुरूभुरू वार्‍यात

केस तुझे मखमली आले गाली
ओठांवर तिळ शोभे गाली खळी
नको तिरक्या नजरेनं पाहू
मीच दिसे तुझ्या डोळ्यात

खट्याळ वारा तुझा ...

झाड रविवार, २५ डिसेंबर २०११, १२:०८ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

झाड
आजकाल कुणी सावलीत येत नाही
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||धृ||

गेले कित्येक उन्हाळे
सावली देत आहे उभा;
कोरडे ठेवीले वाटसरूंस
पावसाळ्यात सुध्दा;
हिवाळ्यात केवळ निष्पर्ण होउन जाई
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||१||

खोड जुन वाढले
फांद्या जुन्या ...