देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Marathi Poem

नववर्ष गीत शनिवार, २४ डिसेंबर २०११, १७:४७ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

नववर्ष गीत

(या गीताच्या चालीसाठी शीर्षकावर क्लिक करा.)

नवे वर्ष हे दौडत आणिल आकांक्षाचे घोडे

उत्साहाने चला जाउ या टाकुन पाउल पुढे

चला हो जाऊ आपण पुढे

चला हो टाकू पाउल ...

तुझ्यासाठी मंगळवार, १३ डिसेंबर २०११, १९:०६ (+०५:३०)

रे घना

ती रुसते रागावते आणि आपण आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून तिला हसवू पहातो. तिच्यासाठी सर्कशीतला विदुषक होतो. गुलाबी गालावर सुकलेले अश्रू पुसत ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते आणि आपण पसरलेल्या बाहूंच्या पंखात विसावते.

कधी कधी आपण रागावतो. आपल्याही नकळत तांडव करतो. ती भेदरते. आपल्या रागाला शरण जाते. आपल्याला हसवू पहाते. उषेचे रंग होते. फुलांचे गंध होते. आपण हरवून जातो त्यात. ...

चला क्रांती घडवू या सोमवार, ०५ डिसेंबर २०११, १४:१२ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

चला क्रांती घडवू या

खपतील जीव ओतुनी धरतीत पेरुनी प्राण ।

मातीत घाम मिसळोनी मातीत पिकविती स्वर्ण ॥

चला कृषि क्रांती घडवू या, चला कृषि क्रांती घडवू या ॥१॥

कौशल्य जिद्द जोडुनी गुणवत्तेस वाढवू या ।

आलस्य स्वार्थ त्यागुनी उत्पन्न वाढवू या ॥

उद्योग क्रांती घडवू या, उद्योग क्रांती घडवू या ॥२॥

.... स्वप्न... रविवार, २० नोव्हेंबर २०११, २०:४९ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

.... स्वप्न ....

स्वप्न ..... स्वक़्प्न कशी असतात ... म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळी असतात .... पण प्रत्येक जन त्याला कश्या बरोबर तरी compare करतो .... माझ्या काही मित्राना विचारला तर त्यांनी सांगितलं ... "Dreams are those which can never turn into reality" ... Dreams are Uncontrolled" .... "Dreams can sometimes turn into reality" .... "Dreams is is the our place of having whatever we want..."

.... स्वप्न ....

स्वप्न आकाशातल्या काळ्या ढगांसारखी असतात ....
जसे आकाशात काळे ढग दाटून आले कि पाऊस ...

हंसा मुलांनो हंसा मंगळवार, ०८ नोव्हेंबर २०११, ०९:०५ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

येणाऱ्या बालदिवसाच्या निमित्ताने मी हे बालगीत अपलोड करीत आहे. हंसण्याचं महत्व सांगणारं हे गीत स्टेजवरही सादर करता येते. गाण्याची चाल समजावी म्हणून ...

माझ्यात काय आहे? रविवार, २३ ऑक्टोबर २०११, १३:५८ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

माझ्यात काय आहे? मराठी द्वंद्वगीत माझ्या आवाजात आपण हे गीत ऐकावे म्हणून हा व्हिडिओ अपलोड केलेला नाही. ...

थ्री इडीयट्स आणि मैत्री रविवार, ०७ ऑगस्ट २०११, २३:४३ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

नाही, नाही म्हणता आज मी दोनदा लिहितोय. तेही मैत्री दिनाविषयी. कारण माझा या जगात कशावर विश्वास असेल तो परमेश्वरावर, प्रेमावर आणि मैत्रीवर. परमेश्वराची आराधना करावी लागते……….प्रेम हृदयातून यावं लागतं…….आणि मैत्री विश्वासाची हवी असते.

पण या तिन्ही पैकी एकही गोष्ट आपल्या पदरात पडत नाही तेव्हा आयुष्य वाटेवरचा दगड होतं. अनेकजण आपल्याशी ठेचाळतात आपल्याला शिव्या देत मागे टाकून ...

अजूनही त्याच्या आठवणी मंगळवार, ०२ ऑगस्ट २०११, ०७:१० (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

गेला श्रावण मला खूप आनंद देऊन गेला
कारण माझ्याही नकळत
‘ तो ‘ माझ्या आयुष्यात आला.

तो आला माझ्या आयुष्यात
तेव्हा कळलं
यालाच प्रेम म्हणतात.

मग मी वहातच गेले
प्रवाहासारखी खळाळून गात गेले

मी विचारलं त्याला, ” आपण कोण आहोत ?”
तो म्हणाला, ” आत्मा एक असलेली
वेगवेगळ्या ठिकाणी धडधडणारी दोन हृदयं.”

मग आम्ही दोन हृदयांना एक करण्यासाठी धडपडलो
वेळ पडली तेव्हा ...

मी कुणाचा दास नाही गुरुवार, २८ जुलै २०११, ०७:०३ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

( हि मराठी कविता एका खूप उद्विग्न मनस्थितीत लिहिली आहे. ज्वालामुखीतून उफाळणारा लाव्हा बाहेर पडावा, तशी एका वास्तव प्रसंगी हि कविता आकाराला आली आहे. म्हणुनच ……

ते विषाचा घागरी
मी अमृताचा गडवा

किंवा

पेरतो मी सदगुणांना
भोवतीने भोवताली …………

या सारख्या ओळी वाचून. हा काय स्वतःला खूप सदगुणी समजतो काय ? असा सूर कुणीही काढू नये. माझी मनस्थिती समजावून घ्यावी.  दुर्गुण ...

....प्रेम म्हणजे काय???.....कुणीतरी आवड... बुधवार, २० जुलै २०११, २०:५२ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

....प्रेम म्हणजे काय???.....

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की ...कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम ...
कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की ...कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम ....
कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की ...आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम ...
कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम ...