देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संदीप खरे

आता पुन्हा पाऊस येणार... मंगळवार, १५ जून २०१०, २२:५४ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

आता पुन्हा पाऊस येणार,मग आकाष काळं नीळं होणार,मग मातीला गंध फुटणार,मग मधेच वीज पडणार,मग तूझी आठवण येणार,काय रे देवा...मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी ...

हसलो म्हणजे... गुरुवार, २६ फेब्रुवारी २००९, १२:२६ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी;
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही.

हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही;
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके ...

मनातलीचे श्लोक सोमवार, १६ फेब्रुवारी २००९, १०:३८ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे आता वाटताहे,
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे.

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे,
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे.

नको वाटते वाट ह्या पावलांना
नको हालचाली... तनाच्या... मनाच्या,
नकोसे शुभारंभ ध्येया - भियाचे
नकोशाच गप्पा आता सांगतेच्या...

कसे सरतील सये बुधवार, ११ फेब्रुवारी २००९, ११:३१ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फ़ुलं दोन रोज राती डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातुन वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

कोण तुझ्या सौधातून ऊभे असे ...

नसतेस घरी तू जेंव्हा मंगळवार, १० फेब्रुवारी २००९, १०:३५ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो.

नभ फाटून वीज पडावी
कल्लॊळ तसा ऒढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो.

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो.

तव मिठीत ...

आठवतं तुला ? सोमवार, ०९ फेब्रुवारी २००९, १२:३४ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं,
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं.

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता,
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता.

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझा गंध ...

पाऊस शुक्रवार, ०६ फेब्रुवारी २००९, ११:३५ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ...

बरं झालं... मंगळवार, ३० डिसेंबर २००८, ११:५५ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो...
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन...
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन...
येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा..."

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील...

म्हणालो नाही... बुधवार, २४ डिसेंबर २००८, ११:४९ (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी ?' ते ही 'सांग' म्हणालो नाही,
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही...

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती,
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी
'जा! फिटले सारे पांग!' म्हणालो नाही...

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय्य लागला ...

सिनेमाला न जाणे... रविवार, १३ एप्रिल २००८, २३:५८ (+०५:३०)

आस गेस्टरुम-संदीप खरे

३० - ३ - २००८

एकदा काय झालं...
एक होता ' तो ' ... एक होती ' ती ' ... आणि एक होता सिनेमा!
तिघांनी एकदा भेटायचं ठरवलं...
एकमेकांना पहायचं ठरवलं;
ठरवलं; पण घडलं मात्र नाही...
कशाला तरी घाबरून, कशावर तरी रागावून ती आलीच नाही...
मग त्याने एकट्यानेच थिएटरसमोरच्या बाकड्यावर ठाण मांडलं...
ती येणार नाही माहित असून वाट पाहिली... ती आली नाहीच! कधीच!
कुणी नव्हतंच बोलायला... मग त्याने ...