मागच्या आठवड्यात ‘द पियानिस्ट’ बघितला - त्याच्यावरून नॉर्मलला यायच्या आधी आज ‘हॅनाज सूटकेस’ हाती पडलं, आणि वाचून होईपर्यंत खालीच ठेवता आलं नाही. इथे लिहिल्यावर कदाचित थोडं मनाला हलकं वाटेल, म्हणून इथे लिहिते आहे - नाहीतर आकाश भरून भरून आलंय. काळेकुट्ट ढग जमलेत अगदी :(
झेकोस्लोवाकियामधल्या एका बारा - तेरा वर्षाच्या ज्यू मुलीची, हॅना ब्रॅडीची ही गोष्ट. ‘डायरी ऑफ ...