या देवी सर्वभूतेषु
:
प्राणीमात्राच्या जीवनाची एकंदर जडण घडण श्रद्धेतूनच होत असते. प्रत्यक्ष हे एक श्रद्धेचे महत्त्वाचे प्रमाण आहे. आपण प्रत्यक्ष पाहिलेल्यावर मनुष्यमात्राची सहजच श्रद्धा बसते. त्याच प्रमाणे शब्द प्रमाणाचे. आप्त वाक्यातून पण श्रद्धेचा उगम होत असतो. येथे आप्त म्हणजे नातेवाईक सोयरे धायरे असा अर्थ अभिप्रेत नाही. तर आप्त म्हणजे, संत, साधु, ...