देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझ्या कविता

भक्तीविभोर....!! सोमवार, २४ मे २०१०, २१:५८ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute ...

भक्तीविभोर....!!

चंद्रास ग्रासतांना अंधार घोर झाला
संधी चिकार येता तारा मुजोर झाला

आमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना
पंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला

आता दह्यादुधाला कान्हा नशीब नाही
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला

विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका रविवार, २३ मे २०१०, २१:२९ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute ...

विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका

औंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली
आनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ......॥१॥

हे ऊन व्हंय कां कां व्हंय, काही समजत नाही
पाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही
पन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला
पाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला
इच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ......॥२॥

बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते
घरामंधी घुसावं तं, उकाडा ...

कथा एका आत्मबोधाची...!! शनिवार, २२ मे २०१०, १९:१९ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute ...

कथा एका आत्मबोधाची...!!

तो सर्प...! जन्मत: बिनविषारी होता
फ़ूत्कारणे त्याच्या गावी नव्हते
आचरण त्याचे सरळमार्गी.... कुणाला न दुखावणारे
तेंव्हा त्याच्यावर सगळे..... तुटून पडायचेत
कोल्हे-लांडगे खेकसायचेत... मुंग्या-माकोडे चावायचेत
अज्ञान-सज्ञान, सभ्य-असभ्य, शिक्षित-अशिक्षित
सुसंस्कृत-सुसंस्कारी ........ झाडून सगळीच
त्याला खडे मारारायचीत
तो रडायचा....... केविलवाणी अश्रू ...

कान फ़ळलेच नाही शुक्रवार, २१ मे २०१०, २१:५० (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute ...

कान फ़ळलेच नाही

उपदेशाने कान कसे फ़ळलेच नाही
माझे बहिरेपण त्याला कळलेच नाही

निग्रहाचे धडे दिले विपरीत दशेने
पानगळीतही मग पान गळलेच नाही.

वेदनांचा काढा मग गटागटा प्यालो
तेंव्हापासून व्यथांनी छळलेच नाही

कुटिलतेचा जन्म.......!! गुरुवार, २० मे २०१०, २०:४५ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute ...

कुटिलतेचा जन्म.......!!

मत्सराची ज्योत जेथे शीलगाया लागली
नेमकी तेथे कुटिलता जन्म घ्याया लागली

जळफ़ळ्या वृत्तीवर दवा,औषध तरी कोठले?
आमरस्त्यावरच कांटे पसरवाया लागली

कालपावेतो भुतावळ मी म्हणत होतो तिला
चेटकी होऊन आता ती फ़िराया लागली

वरणभात जुनाट झाला वेगळे खावे म्हणे

सरबत……प्रेमाच्या नात्याचं बुधवार, १९ मे २०१०, २२:२४ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता ...

सरबत…… प्रेमाच्या नात्याचं

मी तिला विचारलं
कसं असावं तुझं-माझं नातं….?
भ्रमर आणि फ़ुलासारखं…?
ती उत्तरली, “नको नको
एकदा मकरंद घेवून भ्रमर गेला की
परतण्याची शक्यता धूसर होते
तसा विरह मला नाही रे सहन व्हायचा”

मग मी तिला विचारलं
कसं असावं तुझं-माझं नातं….?
पतंग आणि पणतीसारखं…?
ती उत्तरली, “नको नको
भावनेच्या उत्तुंग अविष्कारात
पतंगाची आहुती ...

वाघास दात नाहीगायीस अभय देण्या, वाघ... बुधवार, १९ मे २०१०, २०:२६ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute ...

वाघास दात नाही

गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.

सजणीचे रूप …!! मंगळवार, १८ मे २०१०, १९:३३ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता ...

सजणीचे रूप …!!

(पंढरीचा पांडुरंग आणि संतश्रेष्ट
तुकारामांच्या पायी नतमस्तक होवुन)

रूपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ...

हताश औदुंबर मंगळवार, १८ मे २०१०, १९:१४ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute ...

हताश औदुंबर
(बालकवींचा क्षमाप्रार्थी)

ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेवून
निळा पांढरा थवा चालला, रजकण पांघरून
ढोल-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे

पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेवून
अभागीनीचे कुंकूम ...

हव्या कशाला मग सलवारी ? रविवार, १६ मे २०१०, २०:२२ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute ...

हव्या कशाला मग सलवारी ?
भरजरी शालू जुनाट झालेफेकुनी द्या त्या नववारीकम्फ़रटिबल त्या मस्त बिकिन्याहव्या कशाला मग सलवारी ?
नको रुढी, रिवाज नको तेपरंपरागत तर नकोच बाईढिगभर कपडे वापरल्यानेवाढत गेली महागाईकराल जर का माझा अनुनयस्वस्ताई ...