देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मांजर

बायको आणि बोका बुधवार, २९ जून २०११, १९:२९ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना
मांजर, बोका, बायको. नवरा

या लेखाचं शीर्षक वाचल्या नंतर अनेक जण कुतूहलापोटी हा लेख वाचतील. पण हा लेख ( किंवा लेख तरी का म्हणायचं याला स्फुट लेखन हि म्हणू या.) लिहिताना कुणावर टीका करावी असा हेतू मुळीच नाही.
सहज गंमत म्हणून लिहितोय. त्यामुळेच हे लिखाण वाचल्यानंतर स्त्रियांनी माझ्या नावाने बोटं मोडून मला शिव्याशाप देऊ नयेत आणि ...

मांजर आणि आम्ही –भाग १ सोमवार, २७ डिसेंबर २०१०, २१:०७ (+०५:३०)

theSuda ऐका हो ऐका

तुम्ही पुढे वाचण्याआधी “मांजर प्रवेश” वाचून या…. थोडेसे संदर्भ वाचन म्हणून….

आमच्या घरात सगळ्या गोष्टीना नावे आहेत. जमेल त्या सगळ्या गोष्टीना नावे ठेवायचे आमच्या घराण्याची परंपरा आहे असे म्हणल्यास हरकत नाही. तर या नव्या फ्यामिली मेम्बर चे नाव ‘मार्जार’ ठेवावे असा माझा प्रस्ताव होता. पण तो कुणाला ऐकायला गेलाच नाही बहुतेक. कारण माझे पप्पा तिला(मांजराला) चोरटी प्रिन्सेस ...

मांजर प्रवेश सोमवार, २७ डिसेंबर २०१०, २१:०२ (+०५:३०)

theSuda ऐका हो ऐका

लोक हौसेने मांजर पाळतात. कुणाला ते क्युट वाटते तर कुणाला ‘अय्या किती गोड आहे’ असे वाटते म्हणून. पण आमच्या घराची बातच निराळी आहे. माझ्या आईचा संसार सुरु झाल्यापासून तिला मांजरांनी (आणि बोक्यांनी) चांगलाच त्रास दिला आहे. कधी नुकत्याच तापवून ठेवलेल्या अख्ख्या एक लिटर दुधाचा फडशा पडणारे मांजर, कधी नुकतेच घेतलेले दुध फुटबॉल चा गोल केल्यासारखे फरशीवर सांडून जाणारा बोका, तर कधी ...

अनाचरटीय असुचेतन ब्ळॅ शुक्रवार, १७ सप्टेंबर २०१०, १२:०३ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

सध्या. पोष्टीची सुरुवात सध्या नी केली की रटाळ अन् कंटाळवाणं बरंच काय काय सध्याच्या नावाखाली खपवता येतं. (इथे वाचा)

ब्लॉग सुरू करून आता दोन वर्षे होतील. ब्लॉगवर आचरटपणा सुरू करूनही आता जवळजवळ सहा महिने लोटलेत. पण कुठेतरी पाणी मुरतंय. वैचारिक शुष्कता आली आहे. पानगळीच्या हंगामात (त.टी.१) विचारवल्लीची जीर्णपर्णे प्रतिभालतिकेशी संलग्न राहण्याचा एक कृष, असहाय प्रयत्न करून अखेर ...

चित्रपटपूर्ण रविवार सोमवार, २९ मार्च २०१०, १२:३९ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि ...

पोस्ट : अशी का तशी? शनिवार, १३ मार्च २०१०, १३:४८ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

कधीकधी अचानक जोरात पोस्ट लागलीय असं वाटू लागतं पण तेव्हा नेमकं ऑफिसमधे किंवा बसमधे असल्याने बसता येत नाही. घरी येऊन निवांत बसावं म्हणलं तर तोवर पोस्ट सोयिस्करपणे जिरलेली असते… कधी बसल्यानंतर कळतं की फॉल्स आलार्म होता… थोडंसं लिहून तो ड्राफ्ट सेव होतो आणि कधीतरी आपण पूर्ण होऊ ही आशा धरून तशीच बसून राहते. अशा बऱ्याच जिरलेल्या किंवा विझलेल्या पोस्ट्सनंतर जेव्हा एखादी पोस्ट ...

ताप बुधवार, १० मार्च २०१०, १३:२२ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

पावसानं खरंच वैताग आणलाय. काल थोडासा काय भिजलो आणि रात्री लगेच हुडहुडी भरून अंग दुखून कसकस जाणवायला लागली. मग काय, गपचूप झोपलो क्रोसीन घेऊन. घरापासून इतकं दूर असताना बरं नाहीसं वाटण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आई आणि आजीची फार आठवण आली. आज दिवसभर घरीच होतो, त्यात दुपारी एक मस्त भयाण स्वप्न पडलं… मज्जा आहे.

आज दिवसभर तरी बरं वाटलं. दुपारी थोडं काम केलं, थोडी विश्रांती घेतली आणि ...

चल माऊ दूर जाऊ! शुक्रवार, ०१ जानेवारी २०१०, १८:४२ (+०५:३०)

काचा-कवड्या

“मांजरा, आज काय काय गोष्टी घडल्यात! आपल्याला कामासाठी काही दिवस दूरच्या मोठ्ठ्या गावाला जावं लागणार आहे. आणि गंमत म्हणजे त्याच काळात काही अतिशय प्रख्यात चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन तिथे भरणार आहे! वा वा काय छान योगायोग आहे पहा!”

काळ्या-हिरव्या मांजराला काहीच घेणं नव्हतं. बेबलॉश्की नुकताच कामावरून परत आला होता आणि तो आता कधी बशीत दूध ओततोय याचीच फिकीर ...

निळ्या पाण्यात निळी शाई शनिवार, १९ सप्टेंबर २००९, २१:५७ (+०५:३०)

काचा-कवड्या

आजचा दिवस काही बेबलॉश्कीसाठी बरा दिसत नव्हता. त्यानी सकाळी कॉफीत साखरेऐवजी मीठ घातलं, मग नीनाच्या ऐवजी भलत्याच कुणालातरी फोन लावला. हे सगळं कमी की काय म्हणून त्याने धुतलेलेच कपडे परत धुवून काढले! आपण खूप वेंधळ्यासारखं वागतोय हे त्याच्या लक्षात आलंच दुपारपर्यंत. मग त्याला फार ओशाळवाणं वाटायला लागलं.

तसं बघायला गेलं तर असे प्रसंग बेबलॉश्कीच्या आयुष्यात वरचेवर ...

नीनाची भरजरी भेट शनिवार, १२ सप्टेंबर २००९, २२:२२ (+०५:३०)

काचा-कवड्या

त्या दिवशी संध्याकाळी बेबलॉश्की नीनाला भेटायला तिच्या घरी गेला होता. ती गेले काही दिवस गावाला गेलेली असल्यामुळे बेबलॉश्कीला तिला भेटता आलेलं नव्हतं. आता तिच्या घराच्याबाहेर जेव्हा तो पोचला तेव्हा त्याला तिच्या घराची खिडकी उघडी दिसली. त्यानी आत डोकावलं तर त्याला नीना आत पुस्तक वाचत बसलेली दिसली. त्याला वाटलं तिची केस थोडे वाढलेत आणि तिचा रंगही त्याला थोडा सावळा ...