आजकाल कित्येक मराठी ब्लॉगांवर कुठल्या ना कुठल्या सेवा संकेतस्थळांच्या बटना बघावयास मिळतात. त्यामध्ये वेगवेगळे विजेट्स - म्हणजे उदा. ब्लॉग वाचण्याकरिता कोण कुठून आले, सध्या जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यातून ब्लॉग बघितला जातोय इ. कार्यक्रम आणि इतर संकेतस्थळांच्या चिन्हकळा, उदा. तुमचा एखादा खाण्याचे पदार्थ बनविण्याबद्दल ब्लॉग असेल तर फक्त खाण्याची प्रकिया गोळा करण्याऱ्या संकेतस्थळाचे "बटन" तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लावू शकता.
याच धर्तीवर मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह आता तयार आहे. हे चिन्ह तुमच्या "मराठी" ब्लॉगवर जोडल्यास तुमच्या ब्लॉगवरील प्रकाशित नोंदी तासभर न घेता लगेचच मराठी ब्लॉग विश्वावर प्रकाशित होण्याचे तंत्र वापरता येईल. याचबरोबर जर ब्लॉगलेखक/लेखिका/कवी/कवयित्री मराठी ब्लॉग विश्वाचे सदस्य असतील तर त्यांचे सदस्य खाते त्यांच्या अगोदरच येथील शृंखलेत समाविष्ट केलेल्या ब्लॉगशी जोडले जाईल. लवकरच सदस्यांना त्यांच्या ब्लॉगसंबंधीत संपादन आणि त्या ब्लॉगचे व्यवस्थापन करण्याची मुभा, ब्लॉगच्या नोंदींबरोबरच ब्लॉगकर्त्याचे छायाचित्र जोडण्याची मुभा इत्यादी गोष्टी उपलब्ध होतील.
तुमचा ब्लॉग जर अगोदरच मराठी ब्लॉग विश्वाच्या सूचीमध्ये समाविष्ट नसेल तरीही तुम्ही मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह खाली दाखविल्याप्रमाणे आपल्या ब्लॉगवर चिकटविल्यास मराठी ब्लॉग विश्वाला तुमच्या मराठी ब्लॉगची माहिती मिळेल व ब्लॉगची शहानिशा केल्यानंतर येथील व्यवस्थापक तो ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वाच्या साखळीमध्ये जोडतील. आमचा कर्मचारीवर्ग फारच मर्यादित असल्यामुळे ब्लॉग जोडण्याची प्रक्रिया कधी कधी २४ तासांपेक्षा जास्त लांबू शकते याची जाणीव असू द्या.
सूचना: ही सोय फक्त तुमच्या मराठीतून प्रकाशित होणाऱ्या ब्लॉगांपुरतीच मर्यादित आहे. इंग्रजी किंवा इतरभाषिक ब्लॉगांवर हे चिन्ह फक्त दिसेल परंतु त्यावरील नोंदी मराठी ब्लॉग विश्वावर दिसणार नाहीत.
तर मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह तुमच्या ब्लॉगवर दाखविण्याकरिता काय करावे?
१) मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह दाखविण्याकरिता लागणारे विजेट कोड (Widget Code) तुमच्या सदस्य खात्याच्या पानाला भेट देऊन मिळवता येईल. त्यासाठी तुम्हाला मराठी ब्लॉग विश्वावर येण्याची नोंद (Login) करावी लागेल. त्यानंतर स्वतःच्या सदस्य खात्याच्या पानाला भेट देऊन तेथील "माझे ब्लॉग पर्याय" ह्या टॅबवर टिचकी देऊन आपल्या ब्लॉगचा पत्ता तेथे असलेल्या फॉर्ममध्ये द्या. "विजेट कोड तयार करा" ही कळ वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह दाखविण्याकरिता आणि तुमच्या ब्लॉगला तुमच्या सदस्य खात्याकरिता जोडण्यासाठी लागणारे विजेट कोड ब्लॉगपत्त्यानंतरच्या रकान्यामध्ये तयार करून मिळेल.
२) हा विजेट कोड जसाच्या तसा उतरवून (Copy) तुमच्या ब्लॉगच्या संरचने(Template)मधील उजव्या किंवा डाव्या बाजूला दिसत असणाऱ्या क्षेत्रा(Right or Left side bar)मध्ये जोडा (Paste). उदा. तुमचा ब्लॉग जर blogspot.com वर असेल तर ब्लॉगरमध्ये "Template" असा पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये तुमच्या ब्लॉगच्या Template मध्ये हवे तसे बदल करता येऊ शकतात. शक्यतो तुमच्या इतर नोंदींच्या सूचीच्या वर किंवा खाली येथील विजेट कोड जोडता येईल. तुमचा विजेट कोड बरोबर जोडला गेला असल्यास तुम्हाला मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह तुमच्या संरचनेप्रमाणे तुमच्या ब्लॉगच्या उजव्या किंवा डाव्या क्षेत्रामध्ये दिसायला लागेल.
३) नवीन नोंदी मराठी ब्लॉग विश्वावर लगेचच प्रकाशित करण्याकरिता तुमच्या नवीन नोंदीच्या संपूर्ण पानावर एकदा तुम्हाला जावे लागेल. उदा. तुमच्या ब्लॉगचा पत्ता http://yourblog.blogspot.com असा असल्यास ते तुमच्या ब्लॉगचे मुख्यपृष्ठ (किंवा नोंदींचे संक्षिप्त स्वरूप) समजल्या जाईल. नोंदीच्या शिर्षकावर टिचकी देऊन तुम्ही तुमच्या नोंदीच्या संपूर्ण पानावर पोहोचाल आणि तुमच्या पत्तादर्शका(URL address bar)मध्ये तुम्हाला तुमच्या नोंदीचा सरळ पत्ता http://yourblog.blogspot.com/2008/02/blog-post1.html अशा प्रकारे दिसेल (नोंदीच्या शिर्षकामध्ये तुमच्या संरचनेमुळे दुवा नसेल तरी "permalink" नावाचा दुवा त्यावर नक्की असेल. त्यावर टिचकी द्या). त्यावेळेला तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील प्रकाशित नोंदीच्या स्वतःच्या पानावर असाल व मराठी ब्लॉग विश्व अशा वेळेसे विजेट कोडचा वापर करून तुमच्या नवीन नोंदीची माहिती लगेच मिळवेल. मराठी ब्लॉग विश्वावरील कार्यक्षमता वाढविण्याकरिता caching चा वापर केला जातो. त्यामुळे तुमची नवीन नोंद मराठी ब्लॉग विश्वाच्या मुख्यपृष्ठावर दिसावयास पाच मिनिटे लागू शकतात.
तुमच्या पुढील ब्लॉग प्रकाशनास मराठी ब्लॉग विश्वाकडून शुभेच्छा!
प्रतिक्रिया
ब्लॉग नोंदी लगेचच म.ब्लॉ.वि.वर प्रकाशित करण्याकरिता
मस्त मला हेच हव होत. या सुखद बदलासाठी मराठीब्लॉग्ज.नेट टीमला धन्यवाद.
"मराठीत पर्यायी शब्दांची सुची" "Glossary"
ब्लॉग नोंदी लगेचच म.ब्लॉ.वि.वर प्रकाशित करण्याकरिता
रविवार, २४ फेब्रुवारी २००८, १२:०५ (+०५:३०)
ह्या आपल्या पोस्ट वरून नवीन सोय उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.
ह्या आपल्या पोस्ट वरची सर्व माहिती काळजीपुर्वक वाचून मी आपण दिलेले त्यातले उद्दीष्ट साध्य करू शकलो.
सर्व वाचत असताना मला एक अडचण आली ती अशी.
"मराठीत पर्यायी शब्दांची सुची" "Glossary" जर का
असती तर मला पटकन अर्थ समजायला जास्त सुलभ झालं असतं.
कंप्युटर जगतातल्या टेकनीकल शब्दांचे जास्त करून, blog च्या संभंदाने, मराठीकरण करून आपण लिहीता ते स्तुत्यच आहे.आणि कधी कधी जास्त प्रचलीत नसलेल्या पर्यायी मराठी शब्दाचा अर्थ पण आपण कंसात देता,ही पण चांगली गोष्ट आहे.
माझ्या सारख्या नव्याने वाचणाऱ्याला Glossary चा उपयोग करून लवकर समजायला जास्त फायद्दयाचं झालं असतं एव्हडंच.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
तुम्ही सांगता त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. कधीकधी पर्यायी मराठी शब्दच समजण्यासाठी फार अवघड होऊन बसतात. सध्या मराठी ब्लॉग विश्वावर ही सोय नाही -त्याबद्दल भविष्यात विचार करता येईल.
मात्र शैलेश खांडेकर आणि मिलिंद भांडारकर यांच्यासारख्या आंतरजालावर सक्रिय असणाऱ्या व्यक्तींनी "मराठी शब्दकोष" सुरु केला आहे. त्याला भेट देऊन तुम्ही संगणक जगतातील किचकट शब्दांची माहिती मिळवू शकता. आणि हो, तुम्हाला नवे शब्द सुचवायचे असतील तर ते देखील तुम्ही तेथे करू शकता.
- सहाय्यक.
कोड काम करत नाही. मदत करा.
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.
माझ्या कविता
फारच छान आहे. आणि खुप सोप्पही!!!!!!!!!!!!!!
blog jodla nahi
anekda praytna karunhi blog jodla gela nahi. apalacinemascope.blogspot.com ha blog yethe jodta yeil ka
blog jodava
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.
blog joda
maza prakashkshirsagar.blogspot.com
krupaya jodava.
http://marathiblogs.net/node/16151
http://marathiblogs.net/node/16151
kay fayda
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.