देवनागरी
Roman
Press F12 to toggle

खाजगी माहिती नीती

या संकेतस्थळावर सदस्यांकडून त्यांच्या विरोप पत्त्याची (email) माहिती मिळविली जाते. मराठी ब्लॉग विश्व ह्या विरोप पत्त्याचा उपयोग सदस्यांशी संबंध साधण्याकरिताच करेल. "मराठी ब्लॉग विश्व" सदस्यांच्या कुठल्याच खाजगी माहितीचा उपयोग इतर कुठल्याही कारणास्तव करणार नाही. सदस्यांचे सदस्य-नाम मात्र "मराठी ब्लॉग विश्वा"वर जाहिररित्या सदस्यांच्या ओळखीसाठी वापरत असल्यामुळे सदस्य-नाम खाजगी माहितीमध्ये मोडणार नाही.

जर सदस्यांनी "व्यक्तिगत निरोपा"ची व्यवस्था त्यांच्या सदस्य खात्यामध्ये केली अथवा कुठल्या प्रतिक्रियेवर किंवा चर्चेच्या विषयावर "कृपया यापुढील प्रतिसादांबद्दल माहिती मला पाठवा" हा पर्याय निवडला असेल तर त्यांना त्या-त्या बाबतीत विरोप मिळू शकतात.

"मराठी ब्लॉग विश्व" अधूनमधून मराठी ब्लॉग जगतामधील घडामोडींबद्दलचे बातमीपत्र सदस्यांना पाठवेल. हे बातमीपत्र नको असल्यास सदस्य त्यांच्या खात्यामध्ये "बातमीपत्र नको" असा पर्याय निवडू शकतील.