आज मी बराच वेळ प्रों.देसायांची तळ्यावर वाट बघत बसलो होतो.काळोख होत आला आहे आता काही भाऊसाहेब नक्कीच येत नाहीत असं मनात आणून जवळ जवळ उठलो होतो.तेव्हड्यात लगबगीने येणार्या प्रो.देसांयाबरोबर आणखी एक व्यक्ति येताना पाहिली.घरी कोणही नवी व्यक्ति आल्यावर भाऊसाहेब माझ्याशी त्याची ओळख करून देण्यात नेहमीच आनंद मानत.
“थांबा, थांबा तुम्हाला डॉ.धारणकरांची ओळख करून ...