देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अनुभव

स्वप्नांच्या जादूनगरीत मंगळवार, ०७ ऑक्टोबर २००८, १५:०६ (+०५:३०)

Priyabhashini मनात आलं ... लिहिलं

राज्याच्या वेशीत आम्ही प्रवेश केला तसे एकाने आमंत्रणपत्रिका आमच्या हातात कोंबली. राजवाड्यात सोहळा सुरू होण्यास थोडाच वेळ बाकी होता. राजवाड्यासमोर लोकांची गर्दी जमू लागली होती. उशीर झाला तर राज्याभिषेकाचा सोहळा लांबूनच पाहावा लागेल ही जाणीव झाली तशी मी मुलीला सांगितले, "हात घट्ट पकड. थोड्या वेळात तोबा गर्दी उसळली की त्यात हरवायचीस कुठेतरी.” आणि आम्ही तिघे राजवाड्याच्या ...

रखडलेलं लिखाण सोमवार, ०६ ऑक्टोबर २००८, ००:४४ (+०५:३०)

संवाद

हे लिहायचं बरेच दिवस मनात आहे आणि या ना त्या कारणाने राहूनच जातय...
(२६ सप्टेंबर २००८)

शेवटी आज मुहूर्त सापडलेला दिसतोय!! दिसतोय म्हणण्याचं कारण, म्हण़जे आजसुद्धा लिहून संपवेनच अशी काही खात्री वाटत नाहीये. बघूयात कसं काय जमतंय - कारण, पहिली ओळ लिहून बरेच दिवस तशीच ठेवलेली - पुढे काहीच नाही!! कधी कधी लिहायचं मनात असतं, विषयही घोळत असतो डोक्यात, पण हव्या तश्या शब्दांत मांडता येईल ...

माझं गणेशोत्सवातलं लिखाण रविवार, ३१ ऑगस्ट २००८, १७:५६ (+०५:३०)

संवाद

गणपतीच्या दिवसांत, मायबोलीवरही ई - गणेशोत्सव साजरा होतो. यावेळी, गणेशोत्सव संयोजक समितीने काही लिहिणार का विचारले आणि मीही होकार दिला. ज्या प्रकारचे लेखन करायचे होते, त्याची रुपरेखा डोक्यात तयार होती आणि आंतर जालावर खूप माहिती उपलब्ध असेल, असा मला जालावर तपासून पाहण्याआधीच आत्मविश्वास होता, अन् जालावर भक्तीही!! :D

जेह्वा शोधायला सुरुवात केली, तेह्वा मात्र मी दिवसागणिक मी ...

डेनवर चा ऐतिहासिक सोहळा शुक्रवार, २९ ऑगस्ट २००८, १६:३६ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

डेनवर चा ऐतिहासिक सोहळा
गुरुवार २८ ऑगस्ट २००८ हा दिवस जागतिक इतिहासात महत्त्वाचा ठरला. बराक ओबामा ह्या उच्चशिक्षित , कृष्णवर्णिय माणसाला अमेरीकेच्या अध्यक्षपदा चा अधिकृत उमेदवार म्हणुन डेमॉक्रॅटिक पक्षाने निवडले ! जवळ जवळ १ लाख लोकांच्या उपस्थितित बराक ओबामा नी अध्यक्षिय उमेदवार पद स्विकारत एक इतिहास घडवला.
मी ह्या ऐतिहासिक सोहळ्याला डेनवर मधे उपस्थित राहु शकलो हे ...

सिकंदराबाद ची शाकाहारी खाद्द संस्कृति मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, १७:१५ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

सिकंदराबाद ची शाकाहारी खाद्द संस्कृति
सिकंदराबाद आणि हैद्राबाद हि जुळी शहरं असली तरी तेथिल खाद्द संस्कृतित बरीच भिन्नता आहे. ढोबळ मनाने.. सिकंदराबाद हे जास्त "ट्रॅडिशनल" आणि "हिन्दु संस्कृति प्रधान" असे वाटले.
शाकाहारी असल्याने मला सिकंदराबाद ची खाद्द संस्कृति जास्त भावली. हा ब्लॉग मी बराच आधी लिहायला हवा होता पण आता मेक्सिकन आणि इटालियन खाद्द संस्कृतित रमताना मला सकाळ ...

शांतक्षण आणि ती गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, ०९:२० (+०५:३०)

संवादिनी संवादिनी

गिरगावांतलं एक मॅटर्निटी होम. लेबरमध्ये गेलेली एक आई. दरवाज्याबाहेर अधीरतेने फेऱ्या मारणारा एक बाबा. बराच वेळ लागलेला. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चाललेले. डॉक्टरांनी दिलेली तारीख देऊन सतरा दिवस झालेले. संध्याकाळची वेळ. बाबाच्या चेहऱ्याला चिंतेचं ग्रहण लागलेलं. आईच्या वेदनांची काळजी तर होतीच, पण नवीन येणाऱ्या जीवाचीही तितकीच काळजी होती.

बाहेर एक वेगळीच संध्याकाळ रंगात ...

ऑगस्ट चा कट्टा बुधवार, ३० जुलै २००८, २२:४५ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

ऑगस्ट चा महिना आला कि आमचा कॉलेज चा कट्टा भरलेला असायचा त्या साठि लोक अगदि भल्या सकाळी सकाळी येयचे... हा महिनाच असा अजब आहे. कॉलेज मधे एकदा कधि नाव घातलेले लोकं हि ऑगस्ट मधे कट्ट्या वर बसायला येयचे. हा कटटा होताच असा.
"ह्यावर्षि पाखरांचे थवे ऍडमीशन फॉर्म घेवुन गेले आहेत रे.. सकाळी लवकर ये कट्टया वर.. " इति दिन्या
हा डायलॉग दिन्या दर वर्षि टाकतो.. त्याचा उत्साह ऑगस्ट च्या महिन्यात ...

बंगलोर आणि २५ जुलै २००८ रविवार, २७ जुलै २००८, १२:४० (+०५:३०)

संवाद

शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगलोर सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगलोरमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही...

नेहमीप्रमाणे रस्त्यावरची बरीचशी दुकानं बंदच असतात. ...

नाटक संपले... गुरुवार, २४ जुलै २००८, २२:०४ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

नाटक संपले...
दोन दिवसाचे नाटक संपले... खेळ चांगलाच रंगला...
कोण जिंकलं ? ... मन्नुभाई... सिंग इज किंग ...
मनमोहन सिंग ये क्या चीज है हे जगाला दाखवुन दिलं ह्या नाटकानी.
२१-२२ जुलै चे दोन दिवसाचे नाटक हे दिल्लीच्या संसदेत रंगलले होते ते जगभर सर्वत्र लोकं पहात होते.. भारतात हि अगदी क्रिकेट मॅच असल्या प्रमाणे लोकं टिव्हि चॅनल्स लावुन पहात होते...
तर हि मॅच जिंकली कोणी ?
माझ्या मते ह्या ...

अनुभव ! रविवार, १३ जुलै २००८, १६:०० (+०५:३०)

Dinesh Gharat सर्वोत्तम मराठी विनोद

सांता : जेंव्हा मी धंदा सुरु केला तेंव्हा माझ्याकडे पैसा होता व माझ्या पार्टनरकडे अनुभव.
बांता : ...