देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कथा

मिळुनी सार्‍याजणी मासिकातील एक कथा शुक्रवार, २१ नोव्हेंबर २००८, १५:०८ (+०५:३०)

aasha हितगुज

कहाणी - एका ह्रदय कुटुंबाची
कथा
वसंत जोशी

परिवर्तनात छोट्या छोट्या व्यक्तिगत योगदानाचं खूप मोल असतं.सामान्य माणसातील असामन्यत्त्वाचा हा दिलासा-मानवी मन हे अनेक कप्प्यांचे बनलेले असते. म्हणूनच कोणत्या समस्येच्या वेळी त्याच्या मनाची प्रतिक्रिया कशी होईल याचा अंदाज करणे कठीण असते. पूर्वीच्या काळी सावत्र नात्याची काळी बाजूच लोकांपुढे यावयाची आणि ती ...

“केवड्याचं बन”_कथा_दिवाळी “रामटेकच्या गडावरून”_२००७ शनिवार, १५ नोव्हेंबर २००८, १७:२७ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

तो संदेश आला आणि राघवचं टाळकंच सटकलं.उंटाच्या पाठीवर शेवटची काडी पडावी तसं.उद्या महोत्सवातला प्रयोग.त्या आधीची ही संध्याकाळ.जरावेळानं छान मद्यपानाला बसता येईल.उद्याच्या प्रयोगाची तयारी.टेन्शन आणि… ...

सेवाभावी (भाग १) मंगळवार, ११ नोव्हेंबर २००८, २०:२३ (+०५:३०)

bhaskarkende भास्कर केन्डे

भाऊसाहेबांचा पंधरा वर्षाचा दबदबा मोडीत काढून अशातच मिसरुड फुटलेला तरणाबांड गोकूळ सरपंच झाला. चांगलं कमावलेलं शरीर, *सटीच्या जत्रात मागच्या पाच दहा वर्षात हमखास कुस्त्या मारलेल्या गोकूळचं बोलणं मोठं भारदस्त पण लाघवी. कुस्तिच्या आखाड्यात तसेच कबड्डीच्या संघात खास दोस्त बनलेले त्याचे मित्र ग्राम पंचायतीत उर्वरीत गटांमधून निवडून आणलेले. आठ पैकी सात जागा घेऊन पॅनलनं ...

“अनावृत्त”_कथा_दिवाळी “मुक्तसंवाद”_२००७ मंगळवार, ११ नोव्हेंबर २००८, २०:१२ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

उपनगरातल्या एका सहकारी गृहनिर्माण संस्थेचा परिसर.बहुसंख्येने अर्थातच मध्यमवर्ग.तांबडं फुटायची वेळ म्हणतात तशी वेळ.रखवालदार डोळे तांबरलेला.मुख्य प्रवेशद्वारावर.पोटापासून ओढ देत जोरदार जांभया देऊन ...

“माझं घर”_कथा_“मैत्रीण”दिवाळी अंक_२००६ मंगळवार, ०४ नोव्हेंबर २००८, १८:२० (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

आज…शेवटी आज मी तटस्थपणे माझ्या घराकडे पहातेय.या सणासुदीला बदलल्या जाणाऱ्या, भरगच्च हाराखालच्या फोटोत बसून…माझं घराचं स्वप्नं पूर्ण व्हायला हा एवढा काळ जावा लागला…अजूनही चाललेल्या कुरबुरी मला ऐकू येत ...

नवर्‍याचं आडनाव! गुरुवार, ३० ऑक्टोबर २००८, १५:१० (+०५:३०)

poonam कथापौर्णिमा

"आजी, तुझं नाव काय?"
"माझं? का रे?" कौतुकानी नातवाला जवळ घेत आजीनी विचारलं.
संध्याकाळची जेवण्याआधीची वेळ होती, सगळे घरी होते, थोडा निवांतपणा अनुभवत.. अर्णवचा अचानक प्रश्न ऐकून सगळ्यांनाच ...

आर्त_“मुक्तसंवाद” दिवाळी’०८ अंक_माझ्या कथेचा काही भाग… शनिवार, २५ ऑक्टोबर २००८, १९:१८ (+०५:३०)

मी...झाड...संध्याकाळ...

 …चला बाई!…आज एवढ्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची…यथासांग सगळं पार पडतंय!शेजारणी चिडवत होत्या सारख्या…मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे!...मुलगा काय, मूल झालं हेच ...

वळणावर ती येते मंगळवार, २१ ऑक्टोबर २००८, १६:१३ (+०५:३०)

Priyabhashini मनात आलं ... लिहिलं

हल्ली मी भल्या पहाटेच उठून ऑफिसला पळायची सवय केली आहे. लवकर पोहोचलं की भराभर कामं आटोपून लवकर निघताही येतं. संध्याकाळी क्लबला जाऊन निवांत गॉल्फ खेळायला वेळ मिळतो. दिवसभर बैठं काम करणार्‍यांना काहीतरी व्यायाम हा हवाच. गॉल्फच्या निमित्ताने व्यायाम होतो, ऑफिसात शिणलेलं डोकं शांत होतं आणि संध्याकाळ बरी जाते. नाहीतर माझ्यासारख्या सड्याफटींग माणसाने घरी एकट्याने काय करायचं हा ...

भाव - (रणजित देसाई याच्या 'आलेख' पुस्तकातील कथा) सोमवार, १३ ऑक्टोबर २००८, १७:५१ (+०५:३०)

aasha हितगुज

भाव
डोंगरउतरणीवर ते पाच-पंचवीस झोपड्यांचं बेरड वस्तीचं गाव होतं।भल्या पहाटे लगमा उठली होती.तिचं सार अंग दुखत होतं.काल सारा दिवस तिने रानात काढला होता.पूर्वी तास दोन तास रानात फिरलं तर टोपलीभर चिन्न गावायची.काल सबंध दिवस फिरुन पोरांच्या तोंडात टाकायला पुरेशी चिन्न मिळाली नव्हती.कालपर्यंत कसेबसे दिवस ढकलले;पण आज काय? त्या विचाराबरोबर लगमाचा आळस कुठच्या कुठे ...

नियमांस धरून… शनिवार, ११ ऑक्टोबर २००८, १३:४४ (+०५:३०)

ऋतू

एनडीटीव्ही आणि आयबीएनवर १७० अधिक ५२ असा आकडा आला तेव्हा माधवेंद्र सिन्हांच्या चेहऱ्यावर किंचीत स्मितरेषा उमटली. पण त्यांना पूर्ण खात्री नव्हती. नेमक्या याचवेळी आतमध्ये एसकेंकडचे म्हणजेच ...