देवनागरी
Roman
Press F12 to toggle

खसखस

बेघर अर्थव्यवस्था गुरुवार, १८ सप्टेंबर २००८, ०२:४४ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

अमेरीकेची (आणि क्रमेणं जगाचीही?) आर्थिक घडी विस्कटण्यामागे अनिर्बंध-अमर्याद घरबांधणी हे मुख्य कारण असल्याचा निर्वाळा बुश प्रशासनाने दिल्याचं वाचलं. ही अशी घरघर लागलेली अर्थव्यवस्था कशी मार्गी लागणार अशा विचारात असताना, मला इतर भाषिक-सामाजिक गमतीदार प्रश्न समोर दिसू लागले आहेत---

  • अमेरीकेतली सामाजिक कारणांमुळे त्रस्त असलेली वृद्ध पिढी आता "कुणी घर घेता का घर?" असं ...

खादंती मंगळवार, २९ जुलै २००८, ०३:०५ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

नुकताच एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. "बाबा गनूश" इत्यादी मेन्यूही छान होता वाचायला दिलेला. तिथे गेल्यावर "व्हॉट इज हॉट" असं विचारायची हुक्की झाली, पण बाहेरची हवा (आणि वेट्रेस!) सोडल्यास गरम म्हणावं असं काही तिथे दिसेना.

अचानक एक "भयंकर" कॅटेगरीतलं संगीत (!) सुरू झालं. मित्राला म्हणालो, "हे फारच झालं--- This music sounds totally Greek to me!"

त्यावरून काही खाद्य-विनोद सुचले. ते ऐकून 'पकला' नाहीत तर ...

हसून हसून पुरेवाट होणे शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, ०५:४२ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

कधीतरी नकळत एखादा विनोद आठवून तुम्ही चार-चौघांत उगाचच हसलात आणि बाकिच्यांनी "काय आहे? काय झालं?" असं विचारल्यानंतर "काही नाही एक ज्योक आठवला" असं तुम्ही म्हणून गेल्यावर सगळ्यांनी नाक मुरडलं की त्यातच त्या विनोदाचं यश आलं. ("...चा पुतळा उगाचच ख्याक्क करून हसला तर कसं वाटेल" या वाक्याचं तसंच आहे; ते आठवलं की मला हसू येतंच)

खरा विनोद सांगणारा इसम जर स्वतःच हसू लागला तर त्या विनोदाची ...

कारणे दाखवा नोटीस गुरुवार, १४ फेब्रुवारी २००८, १३:३८ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

आजचा दिवस "जागतिक हृदयरोग व हृदयविकार निर्मूलन दिवस" म्हणून का ...

धोपट मार्गा सोडू नको! शनिवार, १९ जानेवारी २००८, २०:२३ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥
  • जिथे सागरा धरणी मिळते... तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते.
  • ईशान्त शर्माने रीकी पॉंन्टींगला तंबूचा रस्ता दाखवला.
  • होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती.
  • ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा.
  • लक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड ...

येह मज़धार! रविवार, १६ डिसेंबर २००७, १७:५४ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

शुक्रवार सकाळ उजाडली तीच मुळी धुकं आणि एकंदरीत कुंद वातावरण घेऊन. त्यातूनच "आज दाढी करायचा दिवस म्हणजे वाटच" अशा विचारांत असताना वीज चमकावी तशी एक आयडिया चमकून गेली आणि त्याच उत्साहात दाढी उरकून घेतली. दाढी करण्याचा मला फार ...

एक अवघड विनोद शनिवार, ०८ डिसेंबर २००७, २०:३० (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

फूट ऍन्ड माऊथ डिसीज [फूट इन माउथ नाही ;-)] बद्दल अधिक माहिती सगळ्यांना असण्याचं तसं काही कारण नाही. गो-या साहेबांच्या काळ्या गाई-म्हशींना होणारा हा फिरंगी आजार (म्हणजे माणसांनाही होऊ शकतो म्हणा) होय. याविषयी अधिक माहिती करून ...

चकली! शुक्रवार, ०९ नोव्हेंबर २००७, १७:४४ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

आज गेली कित्येक वर्षे आमची आई दिवाळीला चकल्या करता आलेली आहे। म्हणजे, फक्त दिवाळीच्या फराळासाठीच नव्हे तर इतर वेळीसुद्धा - सुटटीचा खाऊ म्हणून आमच्याकडे चकल्या केल्या जातात। परन्तु लेखाच्या सुरुवातीलाच इतकं असत्य-वदनी असू ...

एक सुखद महामूर्ख रविवार, ०७ ऑक्टोबर २००७, १०:५७ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

काही वेळा आपण जगातले नव्हे विश्वातले सर्वोत्तम महामूर्ख आहोत असं वाटतं. नुसतं वाटतंच असं नाही; तर ते खरंही असतं! म्हणजे तसे आपण नसतो महामूर्ख वगैरे, चांगले हुषार असतो; पण म्हणतात ना, की नुसतं हुषार असून काय उपयोग? तसंच होतं ...

माझीही ग्राफिटी! शनिवार, ०६ ऑक्टोबर २००७, २०:२० (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥
  • आपल्या मोटरसायकलच्या आरश्यात विमान मावलं म्हणजे तुम्ही आकाश जिंकलं असं नाही!
  • कोण म्हणतो महाराष्ट्र बॅंकेचा शेयर म्हणजे महा-भाग नाही?
  • बसमधून उभ्याने जाणा-या एका आजोबांचे आडनाव बसू असेल तर आपली जागा सोडून त्यांना बसू ...