सगळीच गणितं चुकली आहेत......
आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,
आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे
माहीत आहे की तु येणार नाहीस,
तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे
पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,
संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही
सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं
कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं
सकाळची गुलाबी थंडी, ...
एकदा एका कविने ,प्रसवली दो कवने,
आणखी वर आवर्तने । झाली हो कविता ॥
गोंडस काव्य पाहोन, कविमन जाइ हरखोन,
आद्याक्षर पारखोन । बारसे करु म्हणे ॥
मेंदूस दिला ताण, बुद्धीस आणिला शीण,
योग्य ते नामाभिधान । तियेसाठी सुचेना ॥
साजेश्या नावावीण, कैसे व्हावे प्रकाशन,
काव्यनामप्रयोजन । तेथेच की ॥
ऐसे समयी कविमित्र ,संगणकप्रयोगी सुपात्र,
योगायोगे विचित्र । ...
असेलच कोणीही
त्याच्या विश्वात तसंही
इच्छांनी सजवलेलं
एक सुंदर स्वप्न असेल
हृदयाच्या कोप-यातही
एक कोपरा असेल
मनातच मनानं लिहिलेली
अपूर्ण ओळ असेल
त्याची शाई अजूनही
काहीशी ओली असेल
असेलच ...
झुळूक घेऊन आली गारवा,
सोबत काळ्या मेघांचा थवा,
मैत्री असावी...
साखरेसारखी शुभ्र, मधूर, गोडवा देणारी,
जिवनात विरघळणारी आणि अशी की जिवनाहून वेगळी न वाटणारी,
जिवन प्राशन केल्यावरही ...
दीर्घ प्रवासी काही नवथर कुणि होते कसलेले
वृद्ध जोडपे शांत एक त्या खिडकीशी बसलेले
केस रुपेरी,प्रसन्न मुद्रा,बरेच सुरकुतलेले
कैक वादळे त्यांनि उन्हाळे असावे बघितलेले
पुढच्या थांब्यावरी घोळका तरुणाईचा शिरला,
अवखळ किल्बिल चित्कारांनी आसमंत भरला
सहलकरी ते प्रवास त्यांना नवलपरी हे सारे
सहप्रवासी त्रस्त बिचारे पेंगुळले होते सारे
…
त्याच ...
जेंव्हा हातात आली
पहिली बाईक स्वतःची
आठवतोय आनंद
वाटचाल जीवनाची
चालवलेली मनसोक्त
मित्रांना घेऊन
लायसन्सशिवाय
पोलिसांना चुकवून
पेट्रोलसाठी आईकडे
माझं पॆशे मागणं
तिने संपले म्हणून
थोडेसेच ...
कधी प्रश्न असावा तुझ्यापाशी
असावे एक उत्तर माझ्यापाशी
आणि गरज पडावी जीवनाला
मग त्याने आठवावे क्षणाला
कारण असं होईल
क्षणही निघून जातील
कधी चुकावी तुझीही वाट
तिथे नकळत तुज मी दिसावे
आणि ...