देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ओवाळताना डोक्यावर तांदुळ का टाकतात ?

ओवाळताना डोक्यावर तांदुळ का टाकतात ?
कोणाकडे या विषयी माहीत असेल तर कृपया मदत करावी ?

नमस्ते

नमस्ते रमेश कुमार जी,

ओवाळणे हा एक मूर्खपणा आहे. आणि ओवाळताना डोक्यावर तांदूळ टाकून ते तांदूळ वाया घालविणे हा दूसरा.
ही वेदानुसार परम्परा नाही. शास्‍त्रशुद्‍ध अर्थात् वैज्ञानिक वेदविद्‍या अत्यन्त बुद्‍धिमान ईश्‍वराची कृति असल्यामुळे त्यात अपूर्णता नाही.

वैदिक युगाचा अस्त झाक्यानंतर मध्यकालात (गेल्या २ ते ५ हजार वर्षांपूर्वी) उदयास आलेल्या अवैज्ञानिक पौराणिक परम्परा तर्कसंगत नाहीत. अशा पाखण्डापासून दूर राहणे मनुष्याच्या हिताचे आहे.

आपण मनुष्य आहोत त्यामुळे कोणती ही कृति करण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे. अन्धानुकरण नको.

धन्यवाद.

वरील

वरील तत्ववाद पूर्णत: मान्य केला आहे. तरी मला असलेली माहिती पुढीलप्रमाणे :
प्रथम 'ओवाळणे' न म्हणता 'औक्षण' म्हणतात. नंतर 'तांदुळ' न म्हणता 'अक्षता' म्हणतात.
अक्षता हा लक्ष्मीचा प्रसाद फार पुर्वीपासून मानला जातो. त्या टाकून धनं, धान्य, समृद्धी, दिर्घायुष्य यांचा आशिर्वाद दिला जातो.
त्याचप्रमाणे कापूस (सरकी) टाकून "कापसा प्रमाणे म्हातारे (दिर्घायुषी) व्हावे" व दुर्वा (हरळी) टाकून "दुर्वा प्रमाणे वेली( भरभराट) जावे"
असेही म्हणतात.
धन्यवाद.