नभ झाकळलेले वरती
गंध मातीचा दरवळे
पावसाच्या धारांमध्ये
जीव जीवाला ग मिळे
चिंब झाली झाडे वेली
चिंब झाली पाने फुले
प्रियतमाच्या हातात
हात प्रेयसिचा झुले
मुक झाल्या गं भावना
शब्द झाले मुके मुके
एकमेकांच्या सातिने
उंच गगनात झोके
गोड मनात शिरशिरि
काटा अंगावर फुले
मन मनाला मिळाले
ओठ ओठांशि गं बोले
मऊ ऊबदार मिठी
त्यांत प्रेमाचा निवारा
क्षणाक्षणाला फुलतो
अंगावरती शहारा
एकमेकांचे झाहालो
आता न ऊरे अंतर
रतीमदन बोलत
प्रणयाचा गं मंतर...................!