देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मेस...

मेस

मेस म्हणजे मेस असते,
भाजीत नेहमीच एक केस असते,

भात खरच पांढराशुभ्र असतो,
पण खरच सोड्यांचा त्यात वास असतो,

पोळ्यांची तर किमयाच न्यारी,
झटकाल तर कोंडा पडेल भारी,

आता वरणाविषयी का थोडं लिहु ?
पाणि की वरण ओळखा पाहु...?

शंभर लोकांचा मेस मधे वास,
त्याचा बिचारया मेसवाल्याला त्रास,
एवढी भांडी कोण हो धुणार,
मग त्यांना पान्यातुन काढणार,
मिष्टांनाचा सुवास त्यांना जरुर असणार,

एवढे ऎकल्यावर का तुम्ही मेस लावणार ..??
अहो पोटाची खळगी बाहेरगावी कोठुन भरणार,

मित्रांनो आइच्या हातच्या जेवणाची सर
मेसला येत नाही,
कधी कधी वाटते या दुबळ्या शरीराचे कारण मेस तर नाही.....

मनिष....

VAIBHAV MARATHE ,NASHIK

VAIBHAV MARATHE ,NASHIK