देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रेम..

प्रेम

आयुष्यात एकदा तरी चुक होते,
प्रेमाची कल्पना डोक्यात येते,

अर्थात तेव्हा प्रेयसी ठरलेली असते,
मनाची खोली तिच्या विचारांनी भरलेली असते,

मग प्रेमविर प्रेमात आंधळा होतो,
आणि चक्क तिला प्रपोज करतो,

मग प्रेमाचा होकार,
इतरांच्या ह्र्दयांच्या तुकड्यांचा आकार,
याचा त्याला होतो साक्षात्कार,

प्रेमाची गाडी(अहो बैलगाडी) चालायला लागते,
बैलाची कमतरता प्रियकराला भरावी लागते,

प्रियकराला हळुहळु समजायला लागते,
प्रेम करायला खरचं काळीज लागते,
शंभराची नोट रोज मोडावी लागते,
शॆवटी हातात तुरिच घ्यावि लागते,

प्रेमाचे वरील बोल नेहमी खरे नसतात,
जेव्हा दोन मने जुळतात,
तेव्हा खरया प्रेमाची फुले फुलतात,
पैशाचा मोह खरया प्रेमाला नसतो,
खरं प्रेम आपोआप आकार घेतं, त्याला दि एण्ड नसतो....

मनिष...

tumche amche same aste

tumche amche same aste म्हणूनच जग फसते