ओल्या क्शणांची साक्श ते ओले अधर
ती पापणीखालची चोरटी नजर
वळवाच्या पावसासारखी बरसून गेली
प्रिया, अशी श्वासगंधाचे अत्तर शिंपडून गेली...............
क्शण एक मी मोहरुन गेलो
रेशमी मीथीत सारे विसरून गेलो
तिच्या लाडिक नखर्यात विरघळून गेलो
स्वप्नांना माझ्या सजवीत गेली
प्रिया, अशी श्वासगंधाचे अत्तर शिंपडून गेली...............................
केसात फुलवेणी सजवीत गेलो
हलकेच हळु कुरवाळीत गेलो
गालावरती गुलाब फुलवीत गेलो
ति नजरनेच सारे सांगुन गेली
प्रिया, अशी श्वासगंधाचे अत्तर शिंपडून गेली.....................................
सै.अनघा देशपांडे आर्लेकर