मी जेव्हा एकांतात असते
तेव्हा मी माझी नसते
एकातांची वेळ आथवणींना घेऊन येते
मन मग तुझ्यासोबत रेंगाळते
तुलाही कळून चुकले होते
मी तुझ्यात गुंतले होते
काय करावे कळत नव्ह्ते
वेळ ही नव्ह्ता;वय ही नव्ह्ते
कितीदा विचारले होते
सांगना, काय चुकले होते
भ्रमीश्टासारखी वागु नकोस
एवढेच सांगीतले होते
एकाच प्रवहाचे
दोन प्रवासी आपण
मी भरकटत जात होते
तुझे मात्र पाय जमीनीवर होते
सौ.अनघा देशपांडे आर्लेकर
एकाच
एकाच प्रवहाचे
दोन प्रवासी आपण
मी भरकटत जात होते
तुझे मात्र पाय जमीनीवर होते
मस्त...
छान लिहिलय....