देवनागरी
Roman
Press F12 to toggle

lekh

वारी, वारकरी शनिवार, २८ जून २००८, १५:१९ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

पंढरीच्या भेटीसाठी निघालेल्या ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या आणि हजारो वारकरी यामुळे महाराष्ट्र भावभक्तीच्या आनंदानं कोंदून गेलाय. पांडुरंगाच्या समचरणी लीन होण्यासाठी आतुर झालाय. किमान एक हजार वर्षाची परंपरा असणारी ही वारी म्हणजे एक आश्‍चर्यच आहे. हजारो माणसं जमतात काय आणि एका शिस्तीत देहू, आळंदी ते पंढरपूर पायी जातात काय. बरं यासाठी कोणी कोणाला आमंत्रण धाडत नाही, की ...

वाट चुकलेली दिशा शनिवार, २८ जून २००८, ११:०९ (+०५:३०)

sakaal papers Shabda Veena

कुणाहीव्यक्तीची कोणतीही वर्तणूक बदलायची असेल, तर त्या व्यक्तीस स्वतःला तसं वाटल्याशिवाय आणि तिनं तो निर्णय स्वतः घेतल्याशिवाय ती वर्तणूक कुणीही बदलू शकत नाही. बाहेरील दबाव, धमक्‍या काहीही उपयोगी पडत नाहीत. वेश्‍या व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांबाबत हेच निरंतर सत्य लागू आहे. जोपर्यंत प्रत्येक स्त्री स्वतःहून निर्णय घेत नाही, तोपर्यंत वेश्‍या व्यवसाय संपणार नाही.

मला काय हवंय? सोमवार, ०९ जून २००८, १४:२२ (+०५:३०)

sonal m m Silence Speaks......

पैसा : हो! निश्‍चितच त्‍याशिवाय मन:शांती मिळणं कठीण. मला कोणी टाटा-बिर्ला नाही व्‍हायचंय.
पण कधीही मनात आलं (माझ्‍या किंवा माझ्‍या जवळच्‍यांच्‍या) की काहीही घेता यावं.
कोणी कधी मदत मागायला आल्‍यावर पैसे नाहीत ह्‍या कारणाने नाही म्‍हणायला लागू नये. एव्‍हडा पैसा तरी हवा.
नक्‍कीच मेहनतीने कमावलेला, जेणेकरुन रात्रीची स्‍वस्‍थ झोपही मिळावी.

शिस्‍त : त्‍याशिवाय ...

मी, बायको आणि भांडण... सोमवार, ०२ जून २००८, १६:१८ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

काल आम्ही दोघं बोलत होतो. विषय भांडणांचा होता. बायको म्हणाली, पूर्वी तू माझ्याशी एवढा भांडत नव्हतास. तिनं चक्क पाच वर्षांचा हिशोबच काढला. पहिल्या वर्षी अजिबात भांडण झालं नाही. थोडेफार चिडवाचिडवीतून खटके उडाले असतील-नसतील, पण ते सारं मजेमजेनंच होतं. दुसऱ्या वर्षीही तशी भांडणं झाली नाहीत. तिसऱ्या वर्षी थोडीफार. आणि गेलं वर्षभर मी पाहते आहे, दर दोन-तीन दिवसांनी भांडतोस तू ...

तो सुबहाका आलम क्‍या होगा...! शनिवार, ३१ मे २००८, १७:३७ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

त्या दिवशी मला समजलं... प्रत्येकाची वेळ असते, प्रत्येकाचा मूड असतो... आपण या गोष्टी लक्षात न घेता लेबल चिकटवून मोकळे होतो. हा घाट अनुभवावासा मला कधीच वाटला नव्हता, आता पुन्हा त्याच रस्त्यानं जायला निश्‍चित आवडेल.

मध्ये एकदा सहजच बेळगावला जाणं झालं. तसा नेहमी मी तिळारी घाटातून जातो, वेळेची बचत हेच कारण असतं त्यामागं. पण त्यावेळी पोहोचायची फारशी घाई नव्हती म्हणून ...

...खुनापर्यंत का यावं? शनिवार, ३१ मे २००८, १३:१४ (+०५:३०)

sakaal papers Shabda Veena

जगण्याचा वाढता वेग, तीव्र स्पर्धा, सगळं काही स्वत:ला मिळायलाच हवं असा अट्टहास, त्यातून बदलणारे सूर, बदलती कुटुंब व्यवस्था, नवी लाइफस्टाइल या सगळ्यातून कमी होत जाणारा इमोशनल कोशंट... दिल्लीत नुकत्याच झालेल्या आरुषीच्या आणि मुंबईतील नीरज ग्रोव्हरच्या खुनामागे ही कारणं असावीत का? धावता धावता आपल्यातील हिंसेंची ही आदिम प्रेरणा उफाळून वर आली आहे का?

वैशाली ...

लिखाणाकडे तशी मी नकळत वळले. ... बुधवार, २८ मे २००८, १८:१० (+०५:३०)

sonal m m Silence Speaks......

लिखाणाकडे तशी मी नकळत वळले. लहानपणापासून डायरी लिहायचे मी, नाही म्‍हणायला. पण त्‍यातले विचार अतिशय अंदाधुंद, विस्‍कळीत असायचे. मला नक्‍की काय म्‍हणायचंय ते मी चपखल अशा शब्‍दात कधीच मांडू शकले नाही. सुरु एकीकडून केले तर शेवट दुसरीकडेच कुठेतरी व्‍हायचा. मूळ मुद्‍दा हरवूनच जायचा. आणि नंतर वाचायला घेतले की मीच हरवून जायचे त्‍यात.

मनातली घुसमट बाहेर काढणं हा मुळ हेतु असायचा. ...

नाती बुधवार, २८ मे २००८, १२:१८ (+०५:३०)

sonal m m Silence Speaks......

मनुष्‍य प्राणी ही समुहात वावारणारी जमात !! रक्‍ताची नाती निसर्ग न विचारता बहाल करतो..
आपण जसे मोठे होत जातो (वयानी बरं का) आपण आपली नवी नाती जोडत जातो.
तसं पाहिलं तर जन्‍मभर पुरणारं कोणतंच नातं नाही... जितकी नवी नाती बनत जातात,
तशीच जुनी तुटंत राहतात.. काही प्रत्‍यक्ष अंतरामुळे तर काही मनात पडत जाणर्‍या खोल खोल दरीमुळे. तरी आपल्‍याला माणसं जोडावीशी वाटतंच राहतात...निसर्गाचा ...

निचरा शुक्रवार, २३ मे २००८, ११:४१ (+०५:३०)

sonal m m Silence Speaks......

आज सकाळी सकाळी बाथरुमचं "drain" तुंबलं होतं. त्‍याच्‍या साफसफाईकडे बर्‍याच दिवसात दुर्लक्ष झालं होतं.
"drainex" टाकलं आणि जादू व्‍हावी तशी सगळी घाण साफ धुवून निघाली. ...

बलात्‍कार ही काय फक्‍तं शारीर क्रिया ... मंगळवार, १३ मे २००८, १२:२६ (+०५:३०)

sonal m m Silence Speaks......

बलात्‍कार ही काय फक्‍तं शारीर क्रिया आहे? मला नाही वाटत तसं. जेव्‍हा एखाद्‍या मनाचा तोल ढळतो,
तेव्‍हा तिथेच पहिला बलात्‍कार झालेला असतो. मग घटते ती फक्‍तं क्रिया ! त्‍याची तर गणतीच नको. तुम्‍ही प्रामाणिक, सज्‍जन आहात म्‍हणजे नेमकं काय? जर तुमच्‍या मनात स्‍त्रिला पाहिल्‍यावर फक्‍तं वासनाच येते,
तर तुम्‍ही तसं काही प्रत्‍यक्ष केलं नाही म्‍हणून फक्‍तं प्रामाणिक ठरता का? मनात ...