देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राजकारण व सामाजिक प्रश्न

धार्मिक साम्राज्यवाद शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ०२:५० (+०५:३०)

Chinmay 'भारद्वाज' रुद्र शक्ती

सध्या मी श्री अनंत काकबा प्रियोलकर यांनी लिहिलेले 'गोवा इंक्विझिशन' हे पुस्तक वाचतो आहे. पोर्तुगिज लोकांनी गोव्यात हिंदु समाजावर जे अनन्वित अत्याचार केलेत त्यांचा हे पुस्तक लेखा-जोखा आहे. पुस्तकातील घटना वाचुन मला रात्री नीट झोप येत नाही. पुस्तकात वाचलेल्या गोष्टी भुता सारख्या डोळ्या समोर फिरतात. परकीय आक्रमकांनी भारतात मांडलेला हैदोस माझ्या साठी नवा नव्हे. मी मुसलमानी ...

जागतिकिकरण आणि आपण शनिवार, १९ जुलै २००८, ११:२६ (+०५:३०)

Chinmay 'भारद्वाज' रुद्र शक्ती

काही तरी कुठे तरी चुकतय! एखादी नसं लागली की हात आतुन दुखतो पण नेमकी कुठली नसं दुखावतेय तेच कळत नाही. अगदी तसंच होत आहे. आपला देश प्रगती करतो आहे. भरधाव वेगानी धावतोय पण कशासाठी धावतोय, कशापायी धावतोय आणि या धावापळीतुन नेमकं काय प्राप्त होणार आहे ते नक्की कळत नाहीया. आमच्या कडच्या पोळ्या करणार्‍या बाईंचा नवरा सायकल रिक्षा चालवतो. दररोज तो रिक्षा ४० रुपये भाड्याने घेतो. दिवसातून ...

जय महाराष्ट्र रविवार, १३ एप्रिल २००८, ०४:४३ (+०५:३०)

Chinmay 'भारद्वाज' रुद्र शक्ती

महाराष्ट्र नव-निर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर वादळ उठवित आहे. विवाद नविन नाहीत व त्यावरचे निदान 'ढ' पणाची लक्षणे आहेत. आपल्या समाजात सध्या कुठलाही विवाद चूक किंवा बरोबर याच दोन दृष्टीकोनातून बघण्याची पध्दत रुढ आहे. काही विवाद जरी या पठडीत मोडत असले तरी बरेचशे मुद्दे चूक किंवा बरोबर यामधील लक्ष्मण रेषेत वावरतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले ...

जोधा-अकबर शनिवार, ०८ मार्च २००८, ०१:४० (+०५:३०)

Chinmay 'भारद्वाज' रुद्र शक्ती

प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात की जोधा-अकबर चित्रपट ऐतिहासिक नाही. चित्रपटाची कथा केवळ एक प्रेम-कहाणी आहे. मी हे मान्य करायला तयार आहे. मला प्रश्न असा पडतो की हिंदी चित्रपटात प्रेम-कहाण्यांचा इतका दुष्काळ पडला आहे की एक क्रुर मुसलमानी सत्तेच्या नायकावर एक मन-घडन प्रेम-कथेवर आशुतोष गोवारीकरांना चित्रपट काढावसा वाटला. मला या चित्रपटावर आक्षेप बरेच आहेत पण ...

संगणक जेंव्हा मरतो तेंव्हा! रविवार, ०२ डिसेंबर २००७, ०२:१८ (+०५:३०)

Chinmay 'भारद्वाज' रुद्र शक्ती

पंगत रंगात आली असता अचानक वीज गेली कि कशी शांतता पसरते तसा माझा कंम्प्युटर 'बुप' आवाज करुन बंद पडल्यावर मला झाल। 'प्लग सैल होता का? बॅटरी तर खराब नाही झाली? च्यायला, अमेरिकेतही वीज जायला लागली वाटत?' अश्या प्रश्नांनी मनात क्षणभरात ...

शिव महिमा मंगळवार, ३१ जुलै २००७, ०७:५८ (+०५:३०)

Chinmay 'भारद्वाज' रुद्र शक्ती

आज गुरुपोर्णिमा, त्या प्रित्यर्थ माझ्या अराध्य दैवताबद्दल थोडं लिहावस वाटलं. खर तर शिवाजींबद्दल जेष्ठ-श्रेष्ठांनी अगणित गौरवास्पद शब्द उधळले आहेत. पण आजच्या समाजात या स्तुती-सुमनांच निर्माल्य व्हायला मुळीच वेळ लागत नाही. ...

मोमिनपुरा रविवार, ०८ जुलै २००७, १४:०९ (+०५:३०)

Chinmay 'भारद्वाज' रुद्र शक्ती

माझा एक चांगला मित्र मोमिनपुर्‍यात रहात असे. त्याच्या घरी पहिल्यांदा गेलो तेंव्हा संपुर्णतः मुस्लिम भागात जायचा माझा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे मी थोडा मनातुन घाबरलेलो होतो. इतका गजबजलेला परिसर मी आधी कधी बघितला नव्हता. ...

प्रतिभाताईंनी उठवलेले राष्ट्र-वादळ मंगळवार, ०३ जुलै २००७, ०४:५१ (+०५:३०)

Chinmay 'भारद्वाज' रुद्र शक्ती

प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होणार माझ्या मनात पहिला प्रश्न हा आला कि ही व्यक्ती कोण? आता, मी उत्तर प्रदेशी असतो किंवा तामिळ असतो तर हा प्रश्न पडणे सहाजिक आहे पण मी मराठी असुन सुध्दा ही व्यक्ती कोण याचा गंध मला नव्हता. अजुनही ...