गावो विश्वस्य मातरः भाग ४ मधील प्रश्नोत्तरांचे संदर्भ या लेखात दिले आहेत. वैद्यांशी फोनवर बोलताना लिहून व रेकॉर्ड करून घेतलेली माहिती योग्य रितीने संपादित करायला जरा वेळ लागला. मला संस्कृत येत नाही, शिवाय मूळ ग्रंथ हाताशी नव्हते. त्यामुळे जे ऐकले आहे ते बरोबर उतरवले आहेत की नाही ही मोठी शंका होती. या श्लोकांचा अर्थ लावणे, व्याकरण तपासणे, संधी-विग्रह करणे या कामात बहुमोल मदत ...