भाग १० आणि तो दिवस उजाडला! सगळ्यांच्या मनात एक विचित्र हुरहुर होती. प्रयोगाच्या यशस्वितेविषयी सगळ्यांच्याच मनात थोडीफार साशंकता होती.निवडक १०,००० जणांना या चांचणी साठी निवडण्यात आले होते. त्यात सर्व थरातील लोक होते.
विरीता विचारमग्न अवस्थेत बसून होती. मानवी स्वभाव हा सर्वाधिक अभ्यासाचा आणि गुंतागुंतीचा विषय आहे हे तिचे जुनेच मत होते. "इतका काळ लोटला, इतक्या पिढ्या उलटल्या, तरिही, आपण त्याच त्या चुका पुनः पुनः करत राहतो.जुन्या ...