रंगमंचाचा प्रेक्षकांच्या डाव्या बाजूचा भाग हळूहळू उजळू लागतो.अंधुक उजेडात हर्षल बसला आहे एका ठोकळेवजा आसनावर प्रेक्षकांकडे तोंड करून,निर्विकार.
त्याच्या डाव्या बाजूला तुरूंगाच्या गजांची भिंत.प्रेक्षकांच्या उजव्या बाजूचा रंगमंचाचा भागही उजळू लागतो तेव्हा तोच व्हिडियोकॅमेरामन डाव्या खांदयावर कॅमेरा घेऊन तसाच दबकत गजापर्यंत आलाय.थोडावेळ थांबून तो कॅमेरा हर्षलवर फोकस ...