देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Other

शोsध - १ शुक्रवार, ०४ जुलै २००८, ००:०६ (+०५:३०)

Somesh GuruVision

तुला शोधणं,
इतकं सोपं नाही !

सुरूवात खरंतर त्यासाठीच झाली,
पण आता कळंतय,
'मीच' हरवलेलो आहे,
मी काय तुला शोधणार ?
..
हो ना ?

परंतु मला हेही माहीत आहे,
की तू मला बघतोयस,

माझं तुला ...

आत्मशोऽध मंगळवार, ०१ जुलै २००८, १५:३२ (+०५:३०)

शिरीष GuruVision

गेले काही दिवस (महिने किंवा वर्षे) यामध्ये जर काही सर्वात मोठा शोध मी लावला असेल तो हा… फक्त मन व मिळालेले शरीर अथवा ...

आई रविवार, ११ मे २००८, २२:३४ (+०५:३०)

Somesh GuruVision

[ मातृदिन विशेष: एक खंत, जी तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात असते , पण आपण कधीच बोलून दाखवत नाही. ]

‘ काय आई
तू कशी आहेस ?’
कधी मी विचारलंच नाही.
तिर्थक्षेत्र ..
.. माझ्या घरातलं
कधी मी पाहिलंच नाही.

घर शुद्ध करणारी गंगा ..
पदतीर्थ या गंगेचं ..
कधी ...

काहीतरी … गुरुवार, ०८ मे २००८, ००:४४ (+०५:३०)

Somesh GuruVision

आकीतीच्या मुहूर्तावर काहीतरी लिहीलं पाहीजे म्हणून हे काहीतरी ( कि काहितरिच काय ? ) लिहितोय. खरं तर मला रोज रोजनिशी लिहीणारांचं फारच अप्रूप वाटत आणि त्यात मराठीत टंकलेखन करत म्हणजे तर ! तसं लिहायचच म्हटलं तर काहीतरी लिहिता येतं त्याचं काही नाही , हो पण लिहायचं काय ? जे माहीत आहे ते लिहायचं की जे माहीत नाही ते लिहायचं ? जे माहीत असतं त्याच्या सीमा जे माहीत नाही त्यापर्यंत मर्यादित ...

शांतपणे ऐकून घेण्याची सवय शनिवार, ०१ मार्च २००८, १०:४६ (+०५:३०)

वैद्या.सौ. ऋता खांडेकर GuruVision

माणसांचे एकमेकांशी नाते परस्पर संवादातून घडते, पक्के होते. एकमेकांची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण खूप लोकांना आपलेच म्हणणे खरे आहे हे ठासून सांगण्याची सवय असते. त्यामागे एक छुपा अहंकार असतो. दुसऱ्याचे म्हणणे काय आहे, तो काय बोलतोय, याकडे लक्षच नसते. किंवा दुसरा बोलत असताना मध्येमध्ये काहितरी विषय काढून बोलण्याची सवय असते. विषय तोडून मध्येच बदललाही जातो. ...

बाबा आमटे : एक कर्मयोगी येशु? गुरुवार, १४ फेब्रुवारी २००८, ०५:५५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

हा खरंतर प्रश्न नसून एक उत्तर आहे. लहानपणी मी जेव्हा बेनहर हा चित्रपट पाहिला तेव्हापासून मनाला नेहमीच वाटत राहिले होते की त्या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे नायकाला क्रूसावर चढवल्यावर जो पाऊस पडला त्याने कुष्ठ ...

स्वतःच्याही आत असणारं अंतर्मन! शुक्रवार, ०१ फेब्रुवारी २००८, २२:४५ (+०५:३०)

वैद्या.सौ. ऋता खांडेकर GuruVision

एका पुस्तकात एका ज्येष्ठ गायकाची आठवण वाचली! एका कार्यक्रमात त्यांच्यासमोर काही मोजकेच श्रोते होते. संयोजक त्यांचा एक मित्र होता. त्याला खूप वाईट वाटले. तो त्यांना म्हणाला, “माफ करा, आज आपल्यासारख्या प्रसिद्ध गायकाच्या ...

कामात राम आहे! शनिवार, १९ जानेवारी २००८, १५:५२ (+०५:३०)

वैद्या.सौ. ऋता खांडेकर GuruVision

(आणि कामात आरामही आहेच)

आपल्याला सर्वांनाच काहीतरी काम करावेच लागते. कष्ट केल्याशिवाय गत्यंतरच नसते. काम करताना बऱ्याच वेळा चिडचिड होते, आळस येतो. त्यामुळे काम व्यवस्थित होत नाही. कामाची बळजबरी वाटू लागते. काम करायचं म्हणून ...

शुभ संक्रांत ! मंगळवार, १५ जानेवारी २००८, ०४:५० (+०५:३०)

वैद्या.सौ. ऋता खांडेकर GuruVision

तिळगुळ घेऊ, तिळगुळ देऊ,झाले गेले विसरून सारे,नव्या भास्करा सामोरे जाऊ ॥ध्रु॥एक दिनकर,अनंत किरणे,एकची आत्मा,अनंत शरिरे,एकची सूर सर्वांनी गाऊ ॥१॥कोण उच्च अन् कोण नीच रे ?अवघी सारी त्याचीच लेकरेनित्य त्याचे स्मरण करू ...

विश्वास (दुसऱ्यावरचा आणि स्वतःवरचाही) रविवार, २३ डिसेंबर २००७, २३:०० (+०५:३०)

वैद्या.सौ. ऋता खांडेकर GuruVision

विश्वास म्हणजे नेमकं काय असतं हो? एखाद्या माणसाविषयीचा आपला निश्चित विचार, त्याला हे काम सांगितल्यावर तो हे काम करणारच अशी खात्री असणं! किंवा एखादी व्यक्ती आपल्या किंमती वस्तूंना हात लावणार नाही याची खात्री असणं। थोडक्यात, ...