देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Prem

रीझउन पाही शनिवार, ०३ मे २००८, ११:१५ (+०५:३०)

mehhekk चांदणी

रीझउन पाही प्रियकर फुलास गोंजारून
प्रेम स्पर्शाने प्रत्येक ...

ओल्या स्पर्शाची जाणीव मंगळवार, १५ एप्रिल २००८, १३:५६ (+०५:३०)

mehhekk चांदणी

समुद्र  किनार्‍याला येऊन बिलगनार्‍या लाटा
येताना भर भरून तुझ्या आठवणी घेऊन येतात
माझ्या मनात उठानार्‍या तुफानी वादळाला ...

त्रिवेणी-पांढर.शुभ्र नात आपल गुरुवार, १० एप्रिल २००८, १०:२७ (+०५:३०)

mehhekk चांदणी

त्रिवेणी
१. पांढर.शुभ्र नात आपल निर्मल दुधा सारख
मृदुता समजूतदार पणा मुलायम मलई सारख ...

अपूर्ण बुधवार, ०९ एप्रिल २००८, १६:५६ (+०५:३०)

mehhekk चांदणी

अपूर्ण
इच्छा,आकांक्षा
फक़त तुलाच आहेत का?
ज्या की नेहेमी सपूर्ण व्हायला हव्यात
दिवस भर काम करून
मी सुद्धा थकून आते
पण तुला त्याचे काय
तुला हवे ते तू ओरबाडून घेतोस
कधी प्रेमाने,कधी हक्क गाजउन
आणि माझ्या भावनांचे काय?
जेव्हा तू थकून येतोस
बोलत सुद्धा नाहीस
प्रेमाचा स्पर्श तर दूरच
मनातली आग देहात पसरते
कामिनी धगधगते
कदाचित सकाळ परयन्त
वीझतही असेल
पण एक अपूर्णतेची 
ठिणगी सुलगाउन………………….. ...

घरटे बांधले तुला गुरुवार, २१ फेब्रुवारी २००८, १२:४७ (+०५:३०)

mehhekk चांदणी

घरटे बांधले तुला
इवलसा चिमना जीव कुठे ग लपला
माझ्या अंगानातला चिवचिवाट कुठे हरवला ?
पुर्वी असायची किती लगबग,किलबिल
चिमनी आणि चिमन जोडीने बसायचे
चालायची थोडी कुजबुज,थोडे प्रेमाचे हितगुज
कधी आपसात कधी माझ्याकडे पाहून हसायचे
झाले तुझे काम,दाणा नाही ठेवलस अजुन
म्हणून विचारायचे ,लटकेच रागवायचे
दाण्याचा नाश्ता करून जायाच असायच
दिवसभर फिरून काम करायाच
लहानसे तिनके,काड्या,कापुस आणून
स्वतःच टुमदार घरट वीणायच
वेळ आली की अंडी उबवायची,पिल्ल निघायची
किती उब होती न तुझ्या घरट्यात,प्रेमाची,मायेची.
त्यातली थोडी उब मला सुद्धा मिळायची
किती गर्व होता तुला पिल्लानवर
सुरेख आहेत म्हणून शंभरदा सागायचिस
मला लागल खुपल तर विचारपूस करायचिस
अगदी आपल्या माणसा सारखी काळजी
दिसायची न मला तुझ्या डोळ्यात,हावभावात
अगदी जिव्हाळ्याच नात होत,तुझ,माझ आणि पिल्लान्च
सुख दुख आपल होत न अगदी एका घरच
मग आता ग काय झाल,कुठे बिनसल
माझ मायेच पाखरू कुठे अचानक उडाल ?
असताव्यस्त झालय घरट,रिकाम झालय माझ घर
निरव शांतता,काळजात रुतनारी
खोल वर भेदलय मनाला असा बोचरा शुकशूकाट
परत हवाय मला तो ओलावा,तो गोंधळ
माझ्यावर  ...

राधिका -तारिणी शनिवार, ०९ फेब्रुवारी २००८, २२:२५ (+०५:३०)

mehhekk चांदणी

राधिका -तारिणी
कृष्ण-राधिकेच्या निश्चल प्रेमा बद्दल,एकमेकांच्या अतूट स्नेहा बद्दल
,कृष्ण भार्या रुख्मिनि च्या मनात सदैव एक सल असे.राधिकेचा कधी
द्वेष नाही केला रुख्मिनिच्या मनाने,पण स्त्री सुलभ मस्तर असावा.
आपण सुधा कृष्णा वर राधिके इतकेच किवा जास्तच प्रेम करतो,कृष्णाचे
प्रेम आपल्यावर आहे,पण हृदयात राधिके साठी खोलवर रुजलेले भाव का?
असा प्रश्न ती सतत कृष्णास करत असे,त्याच प्रश्नाचे उत्तर एकदा मुरलीधरा ने
एका प्रसंगातून दिले.
हे श्री कृष्णा,जगता च्या पालनहारा
उत्तर हवे मजला,विचारी रुख्मिनि
राधिकेशी इतका स्नेह का असावा
मोह माझा करावा,मी तुझी अर्धांगीनी
मनात मी,हृदयात राधिका दिसली
का असा दुरावा,मी तुझी धारिणी
मिश्किल हसे कृष्ण,काही ना वदला
पाहून रुख्मिनि कडे कापिली तर्जनि
रक्त गळे थेब थेंब ,साचले अश्रू  ...

प्रेम सागरात् भीजलेत् सगळे बुधवार, १६ जानेवारी २००८, १०:१० (+०५:३०)

mehhekk चांदणी

प्रेम सागरात् भीजलेत् सगळे
तरी  म्हणती   प्रेमास  अंधळे
पाउल ठेवा जपूनी जरा तुम्ही
उघडे  असुदेत  सतत  ते डोळे
प्रेमात स्वतः ला विसरून जाणे
फक्त दुसर्‍या  साठी  मग  जिणे
जेव्हा ओथम्बुन वाहते घागर
एक मेकांचे नंतर मोजति उणे 
कोणावर प्रेम करण्या पूरवी
आधी स्वतः वर प्रेम करावे
ह्याच सुंदर गुलाब पुष्पानी
दुसरे  ...