नक्षी
मन आरशया चे आंगण
त्यात दिसे हृदय गीता चे स्पंदन
भावनांची झालर त्याला
असावे विश्वासचे कुंपण
स्मित हास्याची प्राजक्ता उधळावी
कधी फक्त अबोली
सप्त सुरानी सजलेली
तेवत ठेवावी समई
वार्या ची फुंकर
असावा चार हातांचा आधार
प्रेमा च्या ताटा भोवती
मोहक शब्दांच्या रांगोळीने
काढावा सुबक नक्षी चा आकार…. ...
संदीपची नवीन कविता - हृदय फेकले तुझ्या दिशेने
साधारणपणे ऑक्टोबर २००७ मध्ये संदीपनी लंडनमध्ये लिहिलेली ही कविता आहे :-
हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्कन्
हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले ...
भीत भीत मी घातले
पापण्यात तू मिटले
उभ्या आयुष्याचे कोडे
एका क्षणात सुटले!
मुठी आवळून सखी
तू जे गुपित झाकले
एका हुंदक्यासरशी
अवचित गं फुटले
गीत ओठांवर येता