देवनागरी
Roman
Press F12 to toggle

poem

तो मीच असेल....................! मंगळवार, १० जून २००८, १८:४५ (+०५:३०)

Amol आभास हा...

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु.
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे.
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल........................!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल................!

भय इथले ... शुक्रवार, ०६ जून २००८, १३:४४ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

भय इथले संपत नाही

मज तुझी आठवण येते...

मी संध्याकाळी गातो

तू मला शिकविली गीते...

ते झरे चंद्र सजणांचे

ही धरतीभगवी माया

तू परतून येवू नकोस सोमवार, ०२ जून २००८, १८:२७ (+०५:३०)

Amol आभास हा...

तू नकळतपणे आलीस माझ्या
हृदयाच्या प्रांगणात चोरपावलानं
अन् समोरुन नाही तर एका
बेसावध क्षणी,तेही मागच्या दारानं

अजाणत्या वयात नाही कळालं
घ्यावा कुणाचा कौल?
बुद्धी नेहमीच सांगत आली
विचार कर खोलपण हृदय घसरलं की
न कळे गेला मनाचा तोल
नंतर लक्षात आलं की तुला
नसे या कशाचंच मोल

अजुनही स्मरतोय मला
तुझा तो अलवार स्पर्श
अन् त्या मागोमागचं
निष्पाप, निरागस ...

कारण शेवटी मी एक.....hmmm kind of true शनिवार, ०१ मार्च २००८, १५:११ (+०५:३०)

Amol आभास हा...

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे AC, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला
पण ...

कोई दीवाना कहता है... सोमवार, २५ फेब्रुवारी २००८, १२:०७ (+०५:३०)

Amolblogs आभास हा...

"कोई दीवाना कहता है कोई पागल समझता है
मगर धरती की बेचैनी को बस बदल समझता है
मैं तुझसे दूर कैसा हूँ तू मुझसे दूर कैसी है
ये तेरा दिल समझता है या मेरा दिल समझता है

मोहब्बत एक एहसासों की पावन सी कहानी है
कभी कबीरा दीवाना था कभी मीरा दीवानी थी
यहाँ सब लोग कहते है मेरी आँखों में आंसू है
जो तू समझे तो मोती है जो ना समझे तो पानी है

समंदर ...

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल गुरुवार, २१ फेब्रुवारी २००८, २०:२५ (+०५:३०)

शंतनु काव्य-शास्त्र-विनोद

भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून ...

कातरवेळी बुधवार, ०२ जानेवारी २००८, १२:०७ (+०५:३०)

mrunmayee मृद्गंध

हळूच ये स्वप्नी माझ्या कधीतरी कातरवेळी
तुझ्या वियोगाच्या उठती कळा उरी कातरवेळी

नकोस रे कालिंदीच्या तटी करू छेडाछेडी
कशी प्रवेशू ओलेती पतीघरी कातरवेळी

नकोस तू पावा छेडू घरापुढे सायंकाळी
थरारते ...

बोलायाचे कितीक आहे पण.... शुक्रवार, २८ डिसेंबर २००७, ०९:२४ (+०५:३०)

शंतनु काव्य-शास्त्र-विनोद

माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही

फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे
तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही

थरथरणार्‍या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव-भावना
स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही

दहा दिशांच्या रिंगणातुनि क्षितीज सुद्धा उल्लंघिन मी
एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही

आम्ही कोण शुक्रवार, २८ डिसेंबर २००७, ०९:२३ (+०५:३०)

शंतनु काव्य-शास्त्र-विनोद

आम्ही कोण म्हणूनि काय पुसता
आम्ही उद्याचे रवी

उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे
आव्हान-क्षेत्रे नवी

संचारू मनसोक्त वायुलहरीं-
वरती पुन्हा एकदा

पादाक्रान्त ...

मराठी मुलगी बुधवार, २८ नोव्हेंबर २००७, २१:५५ (+०५:३०)

Aashish जीवन ...

company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमधे अनेक ...