देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गजल

जिंदगी मंगळवार, ०९ सप्टेंबर २००८, १३:५८ (+०५:३०)

मिलिंद छत्रे मिलिंदछंद

जशी जिंदगी ढळू लागली
काळसावली छळू लागली

कुपोषणाची कीड पसरता
नवी पालवी गळू लागली

शांति-ज्योत ही पेटविल्यावर
शांतता होरपळू लागली

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली

कशास फुंकर तिने ...

पाठीमागे सोमवार, २१ जुलै २००८, १८:११ (+०५:३०)

मिलिंद छत्रे मिलिंदछंद

पाठीमागे

वळणावरती पाऊल वळले पाठीमागे
दोघांमधले नाते पडले पाठीमागे

मेघ जरासे डोंगरमाथा चुंबत गेले
आठवणींचे निर्झर झरले पाठीमागे

तिने अचानक पाठ फिरविली, खेद न त्याचा
दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे

दोरी तुटली, पतंग सुटला, हातांमधुनी
तो गेला अन मन भरकटले ...

जीवघेणे शुक्रवार, १६ मे २००८, ११:५८ (+०५:३०)

मिलिंद छत्रे मिलिंदछंद

जाळणे वणव्याप्रमाणे! जीवघेणे
चांदणे शिंपून जाणे! जीवघेणे

नाव ओठांवर कुणाचे घेत नाही
दर्द का घाली उखाणे जीवघेणे?

एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे

कबुतरांना तारणारे कोण आता?
जर शिबी पाळे ससाणे जीवघेणे

हार - सचिन काकडे मंगळवार, १३ मे २००८, १५:४९ (+०५:३०)

तुमचा आनंद आनंद क्षण

लवती बहार आहे, तरीही नकार आहे
दडती श्वास लहरी, मनही फरार आहे

तशीच नजर लपते, नयनी तुला गं जपते
परी मी धुकेच ठरतो, मी आरपार आहे

रुसली नभात रात दिसली दिव्यात बात
जळती वातही ओली, अंधार फार आहे

आभाळ ...

तू गुरुवार, १७ एप्रिल २००८, ११:५७ (+०५:३०)

मिलिंद छत्रे मिलिंदछंद

आपल्या धर्माप्रमाणे वाग तू
जीवना नाहीस पाणी! आग तू

उसळण्याचे विसरलेल्या सागरा
वादळे माझ्या जवळची माग तू

भेटण्याचे वचन जे होते दिले
येउनी स्वप्नात त्याला जाग तू

सारखा बाजार उसळे वर तरी

बाकी आहे - by अभिजीत दाते मंगळवार, ०१ एप्रिल २००८, १३:५८ (+०५:३०)

तुमचा आनंद आनंद क्षण

सरला प्याला झिंग जराशी बाकी आहे
अजून थोडे दुःख उराशी बाकी आहे

दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे
माझे ‘मी’पण खोल तळाशी बाकी आहे

तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावनधारा
हिशेब माझा जुना उन्हाशी बाकी ...

म्हणे आनंदातही डोळ्यांतून कोसळतो वसंत मंगळवार, ०१ एप्रिल २००८, १३:२९ (+०५:३०)

तुमचा आनंद आनंद क्षण

हलवायचं कोणाला, सारेच निवांत
मी वाचतो प्रेतांचे, अंतकरण जिवंत

स्मशानात राहतो मी, मृतात वाहतो मी
अवषेशांचे ढिगारे, नि गळका आसमंत

आठवायचे ठरवतो, मी विश्वास फिरणारे
सडतात रात्रीला, स्वप्नांचे दिवस ...

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू ... गुरुवार, २० मार्च २००८, ११:१४ (+०५:३०)

तुमचा आनंद आनंद क्षण

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ धृ ॥

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ १ ॥

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ २ ॥

कोणे एके वेळा। विसु झाला खुळा।करावया ... शुक्रवार, २२ फेब्रुवारी २००८, १३:५१ (+०५:३०)

तुमचा आनंद आनंद क्षण

कोणे एके वेळा। विसु झाला खुळा।
करावया गेला। भाषांतर॥

अभंग तुक्याचे । करी विंग्रजीत।
दूध पीतपीत । वाघिणीचे ॥

तुका म्हणे आता। रहावे उगीच।
पहावी बरीच । मजा त्याची॥

हुंदका बुधवार, २० फेब्रुवारी २००८, १९:०५ (+०५:३०)

मिलिंद छत्रे मिलिंदछंद

मराठीगजल ह्या संकेतस्थळावर घेतलेल्या गजल कार्यशाळेत लिहीलेली ही 'तरही' गजल

हुंदका साधा तुझा सांगून गेला
भावनांचा बांध तो फ़ोडून गेला

अंतरीचा ग्रीष्म इतका तप्त होता
चांदण्यांचा स्पर्शही जाळून गेला

आसवांचे पावसाळे, नित्य झाले
मेघ काळा काळजा व्यापून गेला

कवडसा छोटा परी माझ्या ...