देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गोष्ट

बार-ऍट-लॉ सोमवार, ०३ नोव्हेंबर २००८, २३:४३ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती.
सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही.
“अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी ...

“जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये.” गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, २१:३६ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून  समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून ...

आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम. शनिवार, २३ ऑगस्ट २००८, २३:३९ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

जाता जाता मी शिलाला म्हणालो,
“म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही.” 

हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला त्या समारंभात शिलाची भेट होते काय.शिला अमेरिका ...

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते. सोमवार, ११ ऑगस्ट २००८, १९:५३ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 
एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
“तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे.”

कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला  लागला की मग मागे वळून बघणार नाही.
तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्यादारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप ...

उलगता बाजार गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, २१:३७ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

“सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच.”
मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली ...

ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी! शुक्रवार, ११ जुलै २००८, ००:३८ (+०५:३०)

कृष्ण उवाच

ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी

खूप दिवसानी मी धामापुरला गेलो होतो.धामापुरातला परिसर अत्यंत सुंदर आहे.लहानपणी मी माझ्या मामाच्या टुमदार घराच्या आजुबाजूला शेतीवाडी असलेल्या परिसरात वेडा होऊन जायचो.जवळच्याच उंच डोंगरातून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला सुंदर वाट करून डोंगर्‍याच्या उतारावरून पाट बांधून सपाटी आल्यावर लोकांच्या शेतीला मुबलक पाणी देण्याची ...

दोन नवरा बायकोतील काव्यमय संभाषन सोमवार, ३० जून २००८, ०९:४३ (+०५:३०)

दे धक्का !!!

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"

मी नसेन तर
ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर ...

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर. रविवार, २२ जून २००८, २२:३३ (+०५:३०)

कृष्ण उवाच

“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.”

बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे.
त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख ...

“ठेविले अनंते तैसेचि रहावे!” सोमवार, ०५ मे २००८, २२:०२ (+०५:३०)

shrikrishnasamant कृष्ण उवाच

अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही. कदाचित,
 ”ठेविले अनंते तैसेचि रहावे.”असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला.
अनंत नाडकर्णी आमच्या ...

आगे बढो! गुरुवार, ०१ मे २००८, २२:०३ (+०५:३०)

shrikrishnasamant कृष्ण उवाच

खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का “आगे बढो”म्ह्टलं तर किती बरं होईल.
हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण ...