देवनागरी
Roman
Press F12 to toggle

mrathi gazals by anant dhavale

पेटली ह्रदयात होळी आजहीघेरुनी आली ... बुधवार, १६ जानेवारी २००८, १८:५४ (+०५:३०)

anant s .dhavale marathi gazals

पेटली ह्रदयात होळी आजही
घेरुनी आली उदासी आजही

कोणत्या जन्मातला संबंध हा
बांधला जातो तुझ्याशी आजही

मी कितीसा वागलो तेंव्हा खरे
चाचणी घेतो मनाची आजही

जन्मलो होतो इथे केंव्हातरी
चालली आहे भ्रमंती आजही