देवनागरी
Roman
Press F12 to toggle

abhijit's blog

ब्लॉग शिर्षक: abhijit's blog
अनुदिनीकार/प्रेषक: अभिजित पेंढारकर
ब्लॉग पत्ता: http://abhipendharkar.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://abhipendharkar.blogspot.com/feeds ...
Last checked९ तास २६ मिनिटे अगोदर
Time until next refresh० सेकंद left

विक्रमादित्यांचा हट्ट! बुधवार, २५ मार्च २०१५, १०:५२ (+०५:३०)


वर्ल्ड कप स्पर्धेत रोज नवनव्या विक्रमांची नोंद होत आहे. काही विक्रम तर कल्पनेच्याही पलिकडचे आहेत. त्यांची नोंद कशी ठेवली जाते, याचंच आश्चर्य वाटतं.
उदाहरणार्थ, आपल्या देशात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज, अमक्या मैदानावर तमक्या विशिष्ट स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज, सातव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करणारी जोडी, वगैरे वगैरे.

तरीही काही विक्रमांची ...

`प्रभात`ची संध्याकाळ... रविवार, ०४ जानेवारी २०१५, ०९:०२ (+०५:३०)


1997 ला पुण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी कुठलं काम केलं असेल, तर ते जवळची सगळी थिएटर्स शोधून काढायचं. मोठं झाल्यावर पैसे मिळवायला लागल्यावर सगळ्या थिएटर्सचे सगळे सिनेमे बघायचे, हे माझं लहानपणीचं स्वप्न होतं. पुण्यात आल्यावर options जास्त असल्यामुळे ते अंशतः का होईना, साकार करण्याची संधी प्रथमच मिळत होती. भाऊ महाराज बोळात म्हणजे अगदी ...

`येष्टी'चित! सोमवार, ०१ सप्टेंबर २०१४, २०:४८ (+०५:३०)

रत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता एकटे नाही, दोन दोन सिरियलमधल्या डझनभर बायकांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आहे, ही काळजी होती. त्यातल्या कुणा बाईला मध्येच उचकी लागली तर काय घ्या, या विचारानं घालमेल होत होती. पण शेवटी जायचा निर्णय घेतलाच.

ओहोटी रोखण्यासाठीची भरती! शनिवार, २२ मार्च २०१४, १७:२८ (+०५:३०)

निवडणुकांचा मोसम आहे. सगळीकडे प्रचाराचा हलकल्लोळ माजला आहे. राजकीय पक्षांमध्येही तेवढाच हलकल्लोळ आहे, पण तो उमेदवारांपेक्षाही जास्त नाराजांचा, बंडखोर आणि असंतुष्टांचा. हे नाराज, बंडखोर आपली पोळी कशी भाजून घेता येईल, याच्या शोधात असले, तरी निवडणुकांनी इतरही अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खाजगी स्वरूपात काही निविदाही काढण्यात आल्या ...

`स्वप्न` भारत निर्माणाचं....! रविवार, २३ फेब्रुवारी २०१४, १४:५६ (+०५:३०)

जागोजागी लागलेल्या पोस्टरवरचा दाढीचे खुंट वाढलेला तो चेहरा किशा एकटक पाहत उभा होता. त्याचा सखारामकाका ब-याच दिवसांनी गावात येणार होता. सखारामकाका मोठ्या शहरात जाऊन बरीच वर्षं झाली होती, पण किश्या मात्र गावातल्या शेतीतच रमला होता. अखेर बरीच वाट बघितल्यानंतर एकदाची एसटी आली. गावात दिवसभरात येणारी ही एकच एसटी. किशा काकाच्या दर्शनाकडे डोळे लावून बसला होता. पण एकेक ...

`हॅक` तिच्या! मंगळवार, २८ जानेवारी २०१४, १९:४७ (+०५:३०)

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दुःखं तरी किती असावीत!रस्त्यावरचा खड्डा चुकवावा लागला नाही, टीव्हीचे सगळे चॅनेल व्यवस्थित दिसले, बायकोनं एकही दिवस भांडण केलं नाही, बॉसनं फालतू कारणावरून झापलं नाही, असा एकही दिवस उगवत नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात!

गण्या हा असाच एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस. कुणाच्या अध्यात-मध्यात नसलेला. ...

रजनी फॅन्स...डोन्ट मिस द चॅन्स...! मंगळवार, ०७ जानेवारी २०१४, ०९:१३ (+०५:३०)

सासवडला होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सुपरस्टार रजनीकांतला निमंत्रण धाडण्यात आल्यानंतर समस्त सारस्वत विश्वात अपरिमित आनंद झाला. रजनीकांतने येणार असल्याचे गुपचूप कळवून टाकल्यानंतर त्याच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. त्यानुसार संमेलनातील काही कार्यक्रमांमध्येही बदल करण्यात आला.

`मराठी साहित्याचे काय ...

रजनी फॅन्स...डोन्ट मिस द चॅन्स...! मंगळवार, ०७ जानेवारी २०१४, ०९:१३ (+०५:३०)

सासवडला होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सुपरस्टार रजनीकांतला निमंत्रण धाडण्यात आल्यानंतर समस्त सारस्वत विश्वात अपरिमित आनंद झाला. रजनीकांतने येणार असल्याचे गुपचूप कळवून टाकल्यानंतर त्याच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. त्यानुसार संमेलनातील काही कार्यक्रमांमध्येही बदल करण्यात आला.

`मराठी साहित्याचे काय ...

बिनकांद्याचा श्रावण मंगळवार, २० ऑगस्ट २०१३, ०७:१५ (+०५:३०)


""निनाद कुठाय? आत्ताच्या आत्ता त्याला इथे यायला सांग!'' बाहेरून आल्या आल्या श्री. किरकिरेंनी खास "वडीलकी'चा स्वर लावला होता.
""बाबा, तो सोसायटीत खेळायला गेलाय. काय झालंय?'' कु. नं विचारलं.
""तो येऊ दे. मग मला तुमच्याशी एकत्रच बोलायचंय! जा, त्याला हाक मार.''
एवढं बोलून श्री. हातपाय धुवायला गेले. एव्हाना आरडाओरडा ऐकून सौ.सुद्धा फोडणीचा गॅस बंद करून बाहेर आल्या होत्या. कु.ची आणि ...

सलमानभाऊ, "लई भारी'! सोमवार, १९ ऑगस्ट २०१३, १६:५९ (+०५:३०)

दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या "लई भारी' या आगामी चित्रपटातून सलमान खान मराठीत पदार्पण करणार आहे. सलमानच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही दोनशे कोटींचा गल्ला जमवेल आणि सलमानला चित्रपटात घेण्यासाठी मराठी निर्मात्यांच्या रांगा लागतील, अशी शक्‍यता आहे. सलमानच्याच अनेक हिट हिंदी चित्रपटांवरून मराठीत रिमेक करता येऊ शकतो. काही उदाहरणं ः