दिवाळी अंकाची गंमत तर सांगायलाच पाहिजे. या वर्षी अंक आणायला मुंबई मराठी संग्रहालयात जायला उशीर झाला. मला वाटले की आता बहुतेक 'विजयंता', 'सन्मान', किंवा 'संतोष' वगैरे (न ऐकलेल्या) नावाचे अंक मिळणार तर आश्चर्य कांय तर चक्क 'ललित'चा अंक हातात पडला. पहिला वाचक मी. ललितला ग्रंथसंग्रहालयाच्या वाचकांत वाली नाही ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
बरेच लेख लेखक-लेखिकांनी दुसर्या ...