देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी भाषा/संस्कृती

उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन : एक शापित गंधर्व बुधवार, ०६ ऑगस्ट २००८, ०७:४४ (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

परवाच बोलताना कुणीतरी म्हणालं, सगळ्या पेट्रोलपंपांचा संप आहे, म्हणून. आणि माझं मन सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात एखाद्या चुकार वासरासारखं ओढलं गेलं. मंडळी, आपलं मन म्हणजे अजब रसायन आहे, बरं का ? कितीही दावणीला बांधलं तरी जिथे जायचं तिथे जातंच. असो, माझ्यापुढे तो हरवलेला काळ उभा राहिला, आणि मन:चक्षूंसमोर प्रतिमा उभी राहिली, ती एक मळकट बनियान, साधारणत: त्याच रंगाचा पायजामा, ...

आजची खमंग पाककृती: व्यक्तिचित्रे बुधवार, ०६ ऑगस्ट २००८, ०७:४३ (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

आमची प्रेरणास्थाने:

वैविध्यपूर्ण लिहा : आणीबाणीचा शासनकर्ता
भाजणीचे पीठ हे विविध डाळींचे एकत्र दळलेले दळण असते : कमलाबाई ओगले

बरं का मंडळी, आज आम्ही आपल्याला खमंग व्यक्तिचित्रे कशी बनवावीत ते सांगणार आहोत. (आज फक्त पाककृती देतो, हिचे प्रात्यक्षिक पुढल्या एखाद्या लेखात येईलच;-)

व्यक्तिचित्रे ही प्रतिसादांचे बाहुल्य वाढवण्याची सर्वात सोपी पाककृती. येथील सदस्य ...

जालकवींच्या कविता: आवाहन मंगळवार, ०५ ऑगस्ट २००८, ०१:१० (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच. भारताबाहेर पहिल्यांदाच असे अधिकृत साहित्य संमेलन होणार आहे, आणि तेही बे एरिया, ह्या विश्वजालाच्या कर्मभूमीत ! हे साहित्य संमेलन नेहमीपेक्षा वेगळे असावे, ही माफक अपेक्षा रसिकांनी ठेवायला काहीच हरकत नाही. पण मुळात हे वेगळेपण तरी ...

माझ्या साहित्यिक मैत्रांनो (आमच्या आगामी अध्यक्षीय भाषणातून साभार) मंगळवार, ०८ जुलै २००८, ०८:५१ (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बे एरियात होणार ही बातमी मिळाल्यापासून आम्ही सदर संमेलनाच्या घडामोडींवर नजर ठेवून आहोत. मधु मंगेश कर्णिक आणि विंदा करंदीकर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी सदर संमेलनाला दाखवलेला विरोध आम्हाला अधिकच सुखकर वाटला, कारण त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची आमची लहानपणापासूनची महत्वाकांक्षा आता पूर्ण होणार, हे ...

हाण तिच्या मॉमला (अर्थातच, बे एरिया मराठी लिटरेचर कन्वेन्शन) शुक्रवार, ०४ जुलै २००८, १०:५० (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

काय सांगू महाराजा, गेले काही दिवस आम्ही मोरपिसांपेक्षा तलम आणि हलके होऊन साहित्यजगतातील मुष्टियुद्धाच्या रिंगणात बागडतोय. जेव्हा आम्हाला फेब्रुवारी २००९ मधील मराठी साहित्य संमेलन संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात (मराठीत ज्याला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया म्हणतात) होणार हे कळले, तेव्हापासून मुहम्मद अलीच्या शिकवणीतून आम्ही फुलपाखरासारखे बागडतोय, परंतु मधमाशीसारखा चावा ...

संपन््न दशकाची डायरी : अमेरिकावारी बुधवार, २१ नोव्हेंबर २००७, ०५:४७ (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

गेल्या दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला गेलेला साहित्यप्रकार, म्हणजे अमेरिकावारी. हा प्रकार ढोबळमानाने प्रवासवर्णन ह्या प्रकारात मोडतो, पण प्रवासवर्णन हे बरेचदा रोचक असते, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक.

प्रवासवर्णन हा ...

नवीन संकेतस्थळ उभारायचेय? शनिवार, २१ एप्रिल २००७, ०६:५८ (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

माझ्या अनेक मराठी संकेतस्थळांवर होणाऱ्या वावरात मला बरेचदा विचारला जाणारा हा प्रश्न: नवीन मराठी संकेतस्थळ कसे तयार करावे ?
त्यावर माझा लगेच प्रश्न असतो. कशासाठी ?
ह्या प्रश्नानंतर बरेचदा हे उत्तरार्थी लोक गप्प ...

शोधयंत्राचा शोध - भाग १.५ - पुरवणी बुधवार, १८ एप्रिल २००७, ०८:२५ (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

शोधयंत्रात शोध कशाचा घेतात ? माहितीचा.

ही माहिती कुठे असते ? कुठेही. तुमच्या डोक्यात. तुमच्या संगणकावर. तुम्ही दैनंदिनी लिहीत असलात, तर त्यावर. तुम्हाला विरोप (email) येतात, त्यात. तुम्ही इतर संकेतस्थळांवर काहीतरी खरडता, त्यातही. ...

माहितीपूर्ण लेखन शनिवार, १४ एप्रिल २००७, ०७:०० (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

माहितीपूर्ण लेखांची अट घातल्यावर एखादे संकेतस्थळ कशा लेखनप्रकारांनी भरेल, ह्याचा आम्ही विचार करून हे माहितीपूर्ण लेखन केले आहे. कृपया ह्या संकेतस्थळावर मराठीतील माहितीपूर्ण लेखांच्या अभिलाषेने येणाऱ्या वाचकांनी भरभरून ...

संकेतस्थळांची किंमत: एक चिंतन आणि एक प्रयोग शनिवार, ०७ एप्रिल २००७, ०८:३१ (+०५:३०)

milind Milind Bhandarkar

२००६ ह्या वर्षात विश्वजालावर झालेली आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाची घटना कोणती ? यापुढचे काहीही न वाचता, डोळे बंद करा, आणि ह्या प्रश्नाविषयी ५ मिनिटे चिंतन करा.

पाच मिनिटे चिंतन केले? छान. वरच्या प्रश्नाच्या तुम्ही ठरवलेल्या ...