दिवसाची ही तार जराशी सैलच झाली सांज सुरंगी मृदुल करांनी मग ओघळली शिणल्या देही थकलेले मन होते रांगत व्यथा वेदना कुरकुर सारी होते सांगत वाट दिव्याची पहात हिरव्या ताटकळावे नशिबाने मग निमूट सारे शापच घ्यावे तोच कुठुनशी ...
ऐन्यात जिवाच्या दुःखाचे प्रतिबिंब, डोळ्यातुन वाहे अश्रू ओलाचिंब रक्तातुन घुमतो आकांतांचा गाव, पावलोपावली बसे नवा हा घाव हे भग्न धुमारे वणव्यातुन उरलेले, हे सत्य वनाच्या हृदयातुन मुरलेले ही दिशा नसे गं उदसवाणी आज,