देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पिंक

विलासप्रसादांची दिवाळी शनिवार, ०१ नोव्हेंबर २००८, २१:२७ (+०५:३०)

आहे हे असं आहे

दारावर थाप पडली आणि विलासप्रसादांची झोप मोडली. आज पाडवा असूनही विलासप्रसाद अंमळ उशीराच उठले. उठल्याबरोबर ताबडतोब त्यांनी आरशात पाहून केस व्यवस्थित केले, ठेवणीतले हास्य तोंडावर चिकटवले आणि दार उघडले.

हातात ओवाळायचे ताट घेऊन बाईसाहेब उभ्या होत्या.

"हे काय तुम्ही अजून तयार नाही. आज पाडवा ना. रितेशबाबा पण अजून उठायलाय"

कावरेबावरे होऊन विलासप्रसादांनी आजूबाजूला ...

मै टल्ली हो गयी...!! शुक्रवार, ०४ जुलै २००८, ०८:४६ (+०५:३०)

आहे हे असं आहे

नमस्कार मंडळी,

तुम्ही 'मै टल्ली हो गयी' हे नवे गाणे पाहिले आहे का?
मद्यप्राशनाचा अभिनय करत मल्लिका ष्टेजवर नाचत आहे! सोबत रणवीर शौरीही काही झटके मटके मारत आहे. अहो मल्लिका मंडळी मल्लिका!! बॉलीवूडमधील अनेक नटमोगऱ्यांना जिच्या शरीरसंपदेचा हेवा वाटतो ती साक्षात मल्लिका. एवढे असूनही मल्लिकाला आनंद कसला तर टल्ली झाल्याचा.

आहाहा! अहाहा!! आहाहा!!! मल्लिकाने गाण्यावर काय ...

लावूनि कोलीत । आपुला करितील घात ॥ बुधवार, १८ जून २००८, २१:५८ (+०५:३०)

आहे हे असं आहे

भले शाब्बास संजय राऊतसाहेब. या लेखात तुम्ही सनातनवाल्यांची फुलटूच केलेली वाचोन आम्हास परमसंतोष झाला आहे.

अहो मिशा चिकटवोनी का कोणास मावळा होता येते? जे कृत्य करण्याचे लायसन फक्त शिववडावाल्यांना आहे ते कृत्य असे ऐर्‍यागैर्‍यांनी स्वत:च्या शिरावर घेतले की त्यांची मानगूट मोडोन त्यांचा फजितवडा होणार हे तर विधिलिखितच आहे.

बॉम्बस्फोट झाल्यावर आमचे (आणि तुम्ही ज्यांना ...

रेडिओ मिरची आणि संत तुकाराम गुरुवार, २४ एप्रिल २००८, २१:४४ (+०५:३०)

आजानुकर्ण आहे हे असं आहे

रेडिओ सिटी सुरू झाल्यामुळे आता रेडिओ मिरचीचे खंग्री बूच लागले आहे. वैतागलेला श्रोतावर्ग टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची कंबर कसून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे 'मराठी' गाणी ऐकवणे हा!

खरं म्हणजे रेडिओ मिरचीवर मराठी गाणी सुरू झाल्याचे मित्राकडून ऐकल्यावर मी बेशुद्ध पडलो होतो. पण चप्पल हुंगवणे, नाकाला कांदा लावणे वगैरे प्रकारांऐवजी रेडिओ मिरची मला ...

दिल्ले दान... घेतले दान... बुधवार, ०२ एप्रिल २००८, १०:४० (+०५:३०)

आजानुकर्ण आहे हे असं आहे

आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!)

डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार. जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार ...

शाळा सोमवार, ०४ फेब्रुवारी २००८, ११:२१ (+०५:३०)

Yogesh आहे हे असं आहे

आमच्या सुपरष्टारला कोणीही (स्टुलावर उभे राहून) टपली मारावी आणि त्याचे केस विस्कटवून टाकावे याला काय म्हणावे?

राजसाहेबांनी केलेल्या वक्तव्याने आमचे मन इतके दुखावले तर सुपरष्टार साहेबांचे किती दुखावले असेल याची कल्पनाच ...

भारतरत्नचा घोळ आणि उपाय रविवार, २० जानेवारी २००८, २२:२३ (+०५:३०)

Yogesh आहे हे असं आहे

एक तर 'भारतरत्न' च्या वादाबद्दल (मराठी ब्लॉगांव्यतिरिक्त इतरत्र) इतकं सारं लिहून झालं आहे की आमच्या एका मित्राकडे वाचलेल्या "बोलणे थोडे पण थुंकी फार" या वाक्प्रचाराचीच आम्हाला आठवण झाली!

मराठी ब्लॉग विश्व मात्र अर्थपूर्ण ...

बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे शुक्रवार, ०७ डिसेंबर २००७, २३:३२ (+०५:३०)

Yogesh आहे हे असं आहे

कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ ...

बम भोले बम गुरुवार, ०६ डिसेंबर २००७, १९:०७ (+०५:३०)

Yogesh आहे हे असं आहे

मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी.

दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने ...

कन्नडा हाडु बुधवार, २८ नोव्हेंबर २००७, १८:३४ (+०५:३०)

Yogesh आहे हे असं आहे

दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. ...