आयुष्यात कधी स्टेजवर नाचावं लागेल असं मुळीच वाटलं नव्हतं. पण अचानक अनेक गोष्टी घडत असतात... तसाच एकदा नेहाचा अचानक फोन आला... "केदार, आम्ही या spring banquet मध्ये dance करणार आहोत... आणि तू आहेस त्याच्यात". काय सांगायचं या मुलींना ? काही ऐकूनच घेत नाहीत. सांगितलं की मी कधीही नाचाच्या फंदात चुकूनही पडलेलो नाही, लहानपणी गणपती विसर्जनात लेझीम केले होते तेवढच. "एक नंबर, लेझीम आहे आपल्या dance मध्ये.. बाकीचं ...