देवनागरी
Roman
Press F12 to toggle

lifestyle

आणखी एक संदीप... गुरुवार, २१ ऑगस्ट २००८, १५:२० (+०५:३०)

Abhijit फकाणा...

दोन दिवसांपूर्वी आणखी एका आयटीयननं आत्महत्या केल्याचं उघडकीला आलं. पुन्हा एकदा तीच खळबळ, पुन्हा तीच चर्चा आणि पुन्हा एकदा तोच पण अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न... का? तरुण वयात उत्तम नोकरी, उत्तम पगार आणि उत्तम करिअर असताना अशा आत्महत्या का घडाव्यात?

काही दिवसांपूर्वीच संदीपनं सातव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आणि दोन दिवसांपूर्वी सरोजकुमारनं स्वतःला ...

प्रिय संदीप, शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ११:१२ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' ...

हीमनगाची टीप मंगळवार, १५ जुलै २००८, १२:३४ (+०५:३०)

Beehive in Gondwana

हीमनगाची टीप
सकाळपासून
सकाळपर्यन्त

माझी तिखट गोड खाद्ययात्रा... सोमवार, ०९ जून २००८, ११:४१ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

आपल्याला तोंड दिलंय ना, ते चावण्यासाठी (दोन्ही अर्थानं) यावर माझा भक्कम विश्‍वास आहे. त्यामुळे कुठे, कोणत्या वारी आणि किती वाजता काय मिळतं, याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं आणि त्यानुसार त्या त्या वेळी तिथे तिथे जाऊन त्यावर ताव मारणं हे आद्य कर्तव्य ठरतं. (जिज्ञासूंनी येऊन पोटाचा घेर मोजावा!) त्यातच नोकरीच्या निमित्तानं बरीच भटकंती झाली. त्यामुळे तिथे मिळणाऱ्या ...

फक्त थोडा वेळ... शुक्रवार, ०६ जून २००८, ११:५७ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

एक होता लेखक. रोज पहाटे तो समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लिहीत बसे. त्याआधी समुद्रकिनारी फिरण्याचाही त्याचा नेम होता. एके दिवशी फिरताना समुद्रापाशी एक माणूस नाचत असल्यासारखा लयबद्ध हालचाली करताना त्याला दिसला. त्याने कुतूहलाने जवळ जाऊन पाहिले, तर तो माणूस वाकून काहीतरी उचलत होता आणि समुद्रात सोडत होता. लेखकाने त्याला विचारले, ""तू हे काय करतो आहेस?'' ""किनाऱ्यावर आलेले हे स्टारफिश ...

बिन पैशाचा दिवस गुरुवार, ०५ जून २००८, ११:१६ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

ही गोष्ट परवाची आहे. सकाळी ऑफिसला आल्यानंतर लक्षात आलं आपण पाकीट घरीच विसरलोय आणि खिशात फक्त दीड रुपया आहे. खिशात पैसेच नाहीत, ही भावना अशी शब्दात सांगण्याजोगी नाही. काहीतरी विचित्र वाटत होतं खरं! नशिबानं लायसन्स वरच्या खिशात होतं. म्हणजे घरी परतताना पोलिसानं पकडलं तरी प्रश्‍न नव्हता. पण आता दिवसभर पैसे नसताना वावरायचं म्हणजे काहीतरी विचित्रच वाटत होतं. आता करायचं काय, असा ...

पेट्रोल वाढले... आता काय? बुधवार, ०४ जून २००८, १५:४९ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

पेट्रोल वाढले, तर काय... याविषयीची एक भन्नाट क्‍लिप मला एकाने परवा मेल ...

मोबाईल, इंटरनेट, टीव्ही याशिवाय... बुधवार, ०४ जून २००८, १२:२४ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

काल आम्ही चार-पाच मित्र गप्पा मारत बसलो होतो. एकानं विषय काढला, आपण मोबाईल आणि इंटरनेटशिवाय जगू शकू का? त्यावर हिरीरीनं चर्चा झाली. शक्‍यच नाही, असा एक सूर होता. दुसरा सूर होता, तीन-चार वर्षांपूर्वी आपण कुठे वापरत होतो मोबाईल? तेव्हा इंटरनेटचा एवढा प्रभाव कुठे होता? तेव्हा नाही आनंदानं जगलो? आताच काय झालंय?

दोन्ही मतं आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. संपर्कासाठीचं सोपं माध्यम ...

संधीची समानता बुधवार, ०५ सप्टेंबर २००७, २०:५० (+०५:३०)

Shridhar Loni aata bola

विविध उद्योगांच्या मुख्याधिकाऱ्यांचे (सीईओ) वेतन गलेलठ्ठ असून, ते कमी झाले पाहिजे, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मांडल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. जास्त पैसे कमविण्यात गैर काय आहे, असा ...

अभ्यासाचं भिजत घोंगडं सोमवार, ०५ मार्च २००७, ०९:२८ (+०५:३०)

अनु anu

धाप्प!!!रात्रीच्या नीरव शांततेत आवाज घुमला आणि मी दचकून जागी झाले. अर्धा किलो वजनाचं 'पॉइंटर्स इन सी' वेडंवाकडं मुरगळून हातातून खाली पडलं होतं. अभ्यासाचं पुस्तक पडून वाचताना दहा मिनीटात 'नीरव शांतता' 'रव अशांतता' बनते आणि त्यात ...