देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रेमकाव्य

प्रेमभंग सोमवार, ०२ जून २००८, १३:४५ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

चुंबनेही हातची राखून येते
ओठ हल्ली ती जरा मुडपून येते

भेटते रस्त्यात ती परक्याप्रमाणे
हास्यही तोलून अन् मापून येते

गर्व हा नाही बरा, लावण्यमित्रा
वेळ अस्ताची कुठे सांगून येते

ती जणू होते घटोत्कच सांजकाळी
शस्त्र मायावी स्मृती परजून येते

मी उभा निःशस्त्र, शरणागत, पराजित
दैव घावांची रसद घेऊन ...

तोल शुक्रवार, २३ मे २००८, ००:२४ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

काजळकाळ्या नयनि असावे, अधरांच्या गोडीत असावे

रहस्य माझ्या पराभवाचे मोहक त्या जिवणीत असावे

हातांमध्ये हात असावे, ओठांवरती गीत असावे

एकांताच्या ताल-सुरांनी नटलेले संगीत असावे

कुठल्या दूताच्या हाती मी निरोप धाडू समजत ...

पीस मंगळवार, २० मे २००८, १२:४५ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

छेडता मी गीत, मोहरलीस तू
शब्द फुंकर, भाव वारा, पीस तू

अर्थ छेडू लागले शब्दांतले
होउनी मग तार थरथरलीस तू

धुंद झालो ऐकुनी आरोह मी
का समेवर येत अवघडलीस तू?

विस्कटाया लागली माझी घडी
ह्या ...

निरोप गुरुवार, २४ एप्रिल २००८, ०७:४६ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

थांब जराशी, चंद्र नभी मावळला नाही
प्राजक्ताने श्वेत सडा अंथरला नाही...

कुठे संपला झिम्मा ताऱ्यांचा आकाशी ?
रंग उषेने व्योमावर शिंपडला नाही...

रातकिड्यांनी कुठे छेडली, सखे, भैरवी ?
सूर विहंगांचा कानावर पडला ...

कुजबुज शनिवार, १९ एप्रिल २००८, ०७:५६ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे ?
खेळात उभयतांची जिंकून मात झाली

आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे
मध्यान्हिच्या उन्हाची पौर्णीम रात झाली

खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची
हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली

जाता जवळ जरासा, रोमांचली नवोढा

इथे न कोणी मंगळवार, ११ डिसेंबर २००७, १२:४३ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

"तुझ्यासारखे तुझ्याप्रमाणे इथे न कोणी" ही जमीन सुचवल्याबद्दल व गझलेची इस्लाह (दुरुस्ती) केल्याबद्दल श्रीयुत चित्तरंजन भट यांचा मी ऋणी आहे.

तुझ्यासारखे , तुझ्याप्रमाणे इथे न कोणी
तुझे आमच्यापरी दिवाणे इथे न कोणी

वणवा शुक्रवार, २४ ऑगस्ट २००७, २३:५१ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

जोगवा मी वेदनेचा मागतो आहे
जीव पाषाणावरी मी लावतो आहे

होय, सर्वांशी जरी ती बोलते हसुनी
स्वर्ग सूताने तरीही गाठतो आहे

तीच फुंकर घालते अन्‍ तीच मग पुसते
"रात्रभर वणवा कशाने पेटतो आहे?"

वाहते निष्ठाफुले चरणी ...