देवनागरी
Roman
Press F12 to toggle

blog ची शहानिशा होते म्हणजे नक्की काय होते ?

मी ब्लॉग जोडण्यासाठी लागणार्‍या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. माझा ब्लॉग कधी जोडला जाईल?

तुमचाच ब्लॉग आहे की नाही हे तपासले जाते.

तुमचा ब्लॉग आता मराठी ब्लॉग विश्वावरील शृंखलेमध्ये जोडण्यात आला आहे.

विचार करा, कुणीतरी "मराठी ब्लॉग विश्वा"वर सदस्य खाते बनविले आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यामध्ये तुमच्या ब्लॉगचे नाव जोडले तर तुम्हाला ते आवडेल काय? नक्कीच आवडणार नाही!

तुम्ही तुमचा ब्लॉग तुमच्या सदस्य खात्याशी जोडताना तो ब्लॉग तुम्ही स्वतः बनविलेला आहे व त्याची मालकी तुमच्याचकडे आहे याची शहानिशा करणे जरूरी आहे. त्याकरिता तुम्हाला "मराठी ब्लॉग विश्वा"चे चिन्ह तुमच्या ब्लॉगवर लावण्यास सांगितले जाते. तुम्ही जर त्या ब्लॉगचे मालक नसाल तर तुम्हाला ते चिन्ह तुमच्या ब्लॉगवर लावता येणार नाही. आणि जर ते चिन्ह तुमच्या ब्लॉगवर तुमच्या ब्लॉगकरिता बनविलेल्या विजेट कोडच्या द्वारे जर तुमच्या ब्लॉगवर लावले तर तो तुमचाच ब्लॉग आहे हे सिद्ध होते.

बरे, सदस्य खाते ब्लॉगच्या मालकीशी जोडण्याचे काय फायदे?
जवळच्या भविष्यात तुमच्या ब्लॉगच्या "मराठी ब्लॉग विश्वा"वर असलेल्या पानावर तुम्हाला "ब्लॉगमालक" म्हणून बदल करता येतील. हे बदल इतरांना तुमच्या ब्लॉगच्या पानावर करता येणार नाहीत. ही सुविधा उपलब्ध झाल्यावर त्याबद्दल सूचना प्रसिद्ध केल्या जातील.

वा !

ही प्रक्रिया चांगली आहे.

मला एक शंका आहे. मी पण drupal चा वापर करून युनिसरस्वती वापरत एक संकेतस्थळ तयार करत आहे. मी सध्या ते प्रकाशित केलेले नाही तर त्याला हि प्रकाशित केल्यावर इथे जोडता येईल का ? सध्या मी त्याची जास्त माहिती देउ शकत नाही. :( आणि दुसरे असे की मला युनिसरस्वतीच्या की फलकाचे माहिती कुठे मिळेल ? मला "क्रुपया, द्न्यान अशा काही " त्यात अडचणी आहेत. जर थोडी माहिती झाली तर मी स्वत:च एक माहिती पर सचित्र help मदत पत्रक प्रकाशित करू इच्छितो.

कळावे,
veeroo18

क्रुपया मदत मिळेल का ?

मला क्रुपया लिहायच आहे इथे .. कस लिहावं?

veeroo18

युनिसरस्वति कळफलक सहाय्यक आता निर्मिती अवस्थेत आहे.

कृपया, अज्ञानात , अँकर असे अनेक शब्द आता सहज लिहिता येतिल आहे त्या कळफलकावर.
जरा वाट पहा.

किंवा माहित असल्यास सांगा इथे !

veeroo18