देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ललित

मी... शेतकरी! बुधवार, ०३ डिसेंबर २००८, ०८:०७ (+०५:३०)

Ajit ॥ उगाच उवाच ॥

फार म्हणजे फार जुनी काही गोष्ट नाही. आठवी-नववीत असेन तेव्हाची. मोठेपणी तुला काय व्हायचे आहे इत्यादी प्रश्नांचा ब-यापैकी अर्थ कळतो असं ते वय असावं. अर्थात प्रश्नाचा फक्त अर्थच कळतो, नेमकं उत्तर मात्र ठाऊक नसतं असं ते वय (म्हणजे अजुनही सापडलंय की नाही ते माहित नाही, असो); पण मुद्दा तो नाही. त्यावेळी तो प्रश्न कुणी seriously विचारला असता, तर माझं उत्तर अगदी तयार होतं --- शेतकरी!
अगदी ...

जबाबदार वार्तांकन! मंगळवार, ०२ डिसेंबर २००८, १६:०५ (+०५:३०)

poonam कथापौर्णिमा

जबाबदार वार्तांकन म्हणजे काय? जी घटना झाली आहे तिचा सर्व कोनांमधून सांगोपांग आढावा घेऊन तो लोकांसमोर आणणे. हे मुळात कशासाठी? तर, अनेक गोष्टी या सामान्य जनतपासून लपवल्या जातात, किंवा लपतात. तर ...

दिवाळी अंक गुरुवार, १३ नोव्हेंबर २००८, १५:४९ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

दिवाळी अंकाची गंमत तर सांगायलाच पाहिजे. या वर्षी अंक आणायला मुंबई मराठी संग्रहालयात जायला उशीर झाला. मला वाटले की आता बहुतेक 'विजयंता', 'सन्मान', किंवा 'संतोष' वगैरे (न ऐकलेल्या)  नावाचे अंक मिळणार तर आश्चर्य कांय तर चक्क 'ललित'चा अंक हातात पडला. पहिला वाचक मी. ललितला ग्रंथसंग्रहालयाच्या वाचकांत वाली नाही ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

 

 बरेच लेख लेखक-लेखिकांनी दुसर्‍या ...

बुडबुडे मंगळवार, ११ नोव्हेंबर २००८, १८:४७ (+०५:३०)

माझ्या मना माझ्या मना...

कधी कधी आपले विचार म्हणजे शब्दांचे केवळ बुडबुडे असतात किंबहुना आपल्या नकळत ते बऱ्याचदा तसेच असतात. जितके त्या शब्दांचे वजन कमी-जास्त तितकेच त्याचे बुडबुडे लहान-मोठे असतात.

बुडबुडे ह्याचसाठी म्हणतोय कारण त्या शब्दांत साठलेले अनुभव, चिंतन, त्यातील कल्पनाविलास आणि त्याचा अर्थ हे सारे जोपर्यंत एखादी व्यक्ती तो विचार करीत असते किंवा ऐकत असते तोपर्यंतच त्याची मजा असते, ...

असूया! मंगळवार, ११ नोव्हेंबर २००८, १५:३४ (+०५:३०)

poonam कथापौर्णिमा

’दुसर्‍याचं भलं व्हावं म्हणून वाटते ती तळमळ;
अन दुसर्‍याचं भलं झालं, की वाटते ती मळमळ!’

ही ग्राफिटी माहिती असेल, ही वाचल्यानंतर पटकन एक स्मित चेहर्‍यावर आलंही असेल, पण कधी विचार केलाय, हे किती खरं ...

न आकळलेलं काही… शनिवार, ११ ऑक्टोबर २००८, १५:३९ (+०५:३०)

ऋतू

एखाद्या गोष्टीचा आणि आपला ऋणानुबंध का जुळावा हे नेहमीच सांगता येत नसतं. आवड वगैरे कारणं ठीक आहेत. पण ऋणानुबंध त्या पलीकडे असतोच. त्या गोष्टीनं नादावलं ...

मैत्र! शनिवार, ११ ऑक्टोबर २००८, १३:५१ (+०५:३०)

ऋतू

तो आणि मी…
आम्हा दोघांचं मैत्र केव्हापासूचं?
मला तरी सांगता येणार नाही…
मीही तुमच्यासारखाच…
त्याच्या प्रेमात पडलेला…
वेगवेगळ्या रुपात तो भेटतो… तुम्हाला तसाच मलाही…
लहानपणापासून भेटत आलाय…
तो… पाऊस…

गावची माती लाल. ...

नावात काय नाही? शनिवार, ११ ऑक्टोबर २००८, १३:३७ (+०५:३०)

ऋतू

काही कामानिमित्त परवा एका स्नेह्यांच्या घरी फोन केला. त्यांच्या कन्येनं - ओजसनं - फोन घेतला.
‘मोडक बोलतोय. आई आहे?’
‘थांबा हं. देते.’ असं म्हणत तिनं आईकडं फोन ...

साखळी हायकू रविवार, २८ सप्टेंबर २००८, ००:१२ (+०५:३०)

विदग्ध

सुमेधाचा साखळी हायकू पुढे नेतांना अकिराने खो दिला आणि हायकू रचण्याचा प्रयत्न केला. या काव्यप्रकाराबद्दल सईच्या अनुदिनीचा बराच आधार झाला.

दाटल्या सयी
किरणांचा पहारा
भिरभिरला

माझा खो गायत्री आणि जयश्रीला.

साखळीचे नियम (सुमेधाच्या अनुदिनीवरून साभार) -
१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ...

आवडत्या कविता सोमवार, ०८ सप्टेंबर २००८, १३:२६ (+०५:३०)

poonam कथापौर्णिमा

संवेदनी सुरु केलेला आवडत्या कवितांचा खो माझ्याकडे गायत्री (http://manmaitra.blogspot.com/) कडून आला. आभार गायत्री.

कविता हा एक अत्यंत सुंदर साहित्यिक आविष्कार. कित्येक भावना, कित्येक छटा मोजक्या शब्दात ...