सारथी
ती. बाबा आणि सौ. आईस,
बंड्याचा शि. सा.न.वि . वि.
मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो. तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते .
पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत, तसेच इथे सायकलस्वारांना ...