क्रीडाभारती
गेल्या दशकात देशांतर्गत क्रिकट मध्ये धावांचा पाऊस पाडणऱ्या महाराष्ट्राच्या सुरेन्द्र भावेचा नुकत्याच जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या निवडसमितीत समावेश झाल्याने आनंद वाटला. जवळजवळ आठ हजार धावा व अठ्ठावीस शतके ठोकूनही त्या वेळच्या निवडसमितीने त्याच्यावर फारच अन्याय केला होता. दुय्यम दर्जाच्या सार्क कप स्पर्धेत १९९२-९३ मध्ये भारतातर्फे केवळ दोन सामने खेळण्याची ...