सोसण्याचा सूर करतो तो खरा असतो कवी; देखणे जो दु:ख करतो तो खरा असतो कवी.
मौन ज्याचे बोलके अन् बोलताना मौन तो; जो मुक्याचा शब्द होतो तो खरा असतो कवी.
क्रौंच मरतो,पाहताना जो स्वत: घायाळतो; वेदनेचे ...