माझी मी-अशी मी
विनायक कुलकर्णी ह्यांनी लिहिलेलं “मला जगायचंय” हे पुस्तक डॉ. अनिता अवचट ह्यांच्या उदात्त कार्यापासून प्रेरणा घेऊन लिहिलंय.
नायिका एक प्रथितयश डॉक्टर. अतिशय हुशार डॉक्टर पती. खरं तर खो-याने पैसा ओढला असता. पण आपण समाजाचंही काही ऋण फ़ेडायला हवं ह्या भावनेनं व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी आपल्या जीवाचं रान करणा-या, झोकून देणा-या आणि त्यासाठी आपलं जीवन समर्पित ...