मी सुमारे २ आठवड्यापूर्वी गूगलचे क्रोम ब्राउझर माझ्या पीसी वर सुरू केले.
सहसा मी इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असतो. लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स वगैरे
वर्तमानपत्रे वाचण्यासाठी तसेच आन लाइन इन्ग्लिश शब्दकोडी सोडविण्यासाठी
आवश्यक ते फान्ट्स, तसेच जावा डाउन्लोड केलेले आहे.
मात्र क्रोम वापरताना लोकसत्ता वाचता येत नाही, व शब्दकोडी सोडवताना प्लग इन
आवश्यक आहे असा मेसेज येतो. ते डाउनलोड केले तरी पुन्हा तोच मेसेज येतो. आणखी
डाउन्लोड करण्याचा प्रयत्न केला तर ते आधीच प्रस्थापित असल्याची नोन्द येते.
कुणी जाणकार याबाबत मार्गदर्शन करतील काय ?
( इन्टरनेट एक्स्प्लोरर वापरताना काहीही त्रास होत नाही.)