देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Silence Speaks......

ब्लॉग शिर्षक: Silence Speaks......
अनुदिनीकार/प्रेषक: sonal m m
ब्लॉग पत्ता: http://sonalmm.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

मुंबई मेरी जान मंगळवार, २३ डिसेंबर २००८, १२:१२ (+०५:३०)

परवा मुंबई मेरी जान नावाचा एक सिनेमा पाहण्‍‍यात आला. जुलै २००६ च्‍या घटनेचा परीणाम वेगवेगळ्‍या स्‍‍तरातील लोकांवर कसा झाला ह्‍याचे परिणामकारक चित्रण सिनेमात केले आहे. सिनेमा थोडा documentry च्या ढंगाने गेला आहे पण तुम्हाला तो विचार करायला लावल्‍‍याशिवाय राहत नाही.

एक टीव्ही जर्नालिस्‍‍ट, एक मोठ्‍या इंटरनँशनल फर्म मधे काम करणारा सजग नागरीक, आठवड्‍याभरात रिटायर होणार असलेला ...

जीवनाचा आनंद मंगळवार, २३ डिसेंबर २००८, ००:४४ (+०५:३०)

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा मग, मुल झालं की....मोठं घर झालं की..... अशा अनेकांच्या आशा अंगाने वाढतच जाते. दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठिक होईल अशी आपण मनाची समजुत घालतो. मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितच्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती ...

जागो !!! सोमवार, २२ डिसेंबर २००८, १७:४१ (+०५:३०)

मुंबईवर वेळोवेळी, वेगवेगळ्‍या तर्‍हांनी हल्‍ले झाले. हल्‍लीत तर भारतभर कुठे ना कुठे बाँब ब्‍लास्‍ट होतच आहेत. त्‍यानिमित्‍ताने सुरक्षा, पोलिस यंत्रणा इ. चा आढावा घेण्‍याचा सपाटाच लागला आहे. आपल्‍यापैकी प्रत्‍येकानेही सजग नागरिक बनून या ना त्‍या प्रकारे आपआपली मतं व्‍यक्‍तं केली. कोणी कोणाला दोष दिला, राजकारण्‍यांची धिंड काढली. वैयक्‍तिक पातळीवर जागं होण्‍याची गरज आहे ...

अ ब क ड शनिवार, २० डिसेंबर २००८, ११:५२ (+०५:३०)

आई, बाबा, आजी, सुशा, आबा, काका, काकू, दादा, दीदी, ताई, हातू, चिऊ, काऊ, माऊ, शूज, बाप-रे, शीशी-शूशू.....अजुनही बरंच काही...ही आहे माझ्‍या अमलची शब्‍दसंपदा. आता ह्‍या सगळ्‍या ...

वासुदेव शनिवार, २० डिसेंबर २००८, ११:२३ (+०५:३०)

"सकाळच्‍या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला..."

अलिकडे आमच्‍या काँलोनीत हे शब्‍द न् सूर सकाळी सकाळी कानी पडतात. पंढरपूरहून आलेले (हे आपलं माझं गृहितक) हे वासुदेव इथे दारोदारी फिरतात. वासुदेवाची आठवण माझ्‍या लहानपणीची. सकाळच्‍या हव्‍याहव्‍याशा वाटणार्‍या थंडीत, शाळेत जाताना वासुदेवाचं नियमित दर्शन‍ ...

प्रातिनिधीक सोमवार, ०८ डिसेंबर २००८, १३:३१ (+०५:३०)

दूरपर्यंत रस्‍ता जिथवर दिसतोय तिथवर गाड्‍याच गाड्‍या. एखादी गाडी मिलिमीटरभर हलेल इतकीही जागा नाही.
५ मिनिटं......१०मिनिटं.........१५ मिनिटं.........माहित नाही ...

प्रार्थना सोमवार, ०८ डिसेंबर २००८, १३:१५ (+०५:३०)

एक आदिमानव ते एक अतिप्रगत मानव असा माझा प्रवास बराच लांबवरचा झाला. एक बुद्‍धीमान प्राणी,
माणूस म्‍हणून मी इथवर येईन असा विचारही कधी केला नव्‍हता मी.
मी अतिप्रगत - पण बंदुकीच्‍या एका गोळीलाही माझं मला तोंड नाही देता येत. माझी शकलं-शकलं उडतात.
मी अतिप्रगत - पण मला माझ्‍या शत्रुचा चेहरा नाही ओळखता येत. पाठीमागून नाही तर समोरून वार करून
शत्रू मला चीत करतो.
मी अतिप्रगत - मी असा ...